Home /News /videsh /

21 व्या शतकातही या देशात महिलांना Driving License न देण्याचे आदेश

21 व्या शतकातही या देशात महिलांना Driving License न देण्याचे आदेश

तालिबानने यावेळी सत्ता मिळाल्यानंतर त्यांनी पुन्हा महिलांच्या हक्कांवर आघात केला आहे. तालिबानने आपल्या पहिल्या राजवटीतही महिलांचे हक्क हिरावून घेतले होते. तालिबानने महिलांना वाहनचालकाचा परवाना (Driving License) जारी न करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 3 मे : सध्या 21 व्या शतकात महिला प्रत्येक क्षेत्रात चांगली कामगिरी करत आहेत. महिला आणि पुरुष यांच्यात भेदभाव करणं निरर्थक असल्याचं महिलांच्या कर्तृत्वाने दाखवून दिलं आहे. तसंच, महिला दिवसेंदिवस स्वतःच्या अधिकारांबाबत जागरूक होत आहेत. अशा पद्धतीनं जगभरातला समाज प्रगतीपथावर असताना तालिबान मात्र, आपल्या बुरसटलेल्या अतार्किक विचारांना घट्ट पकडून आहे. तसं पाहिलं तर अफगाणिस्तानातील तालिबानी राजवट वरवर महिलांच्या अनेक हक्कांबद्दल बोलत असेल (Violation of women's rights by taliban), पण ते आपला खरा चेहरा लपवू शकत नाहीत. न्यूज एजन्सी एएफपीनुसार, तालिबानच्या अधिकाऱ्यांनी अफगाणिस्तानमधील महिलांना ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License) नाकारली आहेत. अफगाणिस्तानमध्ये पूर्वी पितृसत्ताक समाज होता. परंतु, मोठ्या शहरांमध्ये महिला सर्रासपणे वाहनं चालवत होत्या. हे वाचा - व्लादिमीर पुतिन यांना पार्किन्सन? शरीराच्या अनियंत्रित हालचालींमुळे अफवा VIDEO हेरातमधील वाहतूक व्यवस्थापन संस्थेचे प्रमुख जान आगा अचकझाई म्हणाले, "महिलांना वाहन चालवण्याचे परवाने देणं बंद करण्याच्या तोंडी सूचना आम्हाला देण्यात आल्या आहेत." (Taliban against women rights) मोटार प्रशिक्षण शाळा चालवणाऱ्या अदीला अदील म्हणाल्या की, तालिबानची इच्छा आहे की, पुढच्या पिढीला त्यांचे पालक आज घेत असलेल्या सर्व सुविधा मिळू नयेत. ते म्हणाले, आम्हाला सांगण्यात आलं आहे की, महिलांना गाडी चालवायला शिकवू नका आणि त्यांना ड्रायव्हिंग लायसन्स देऊ नका. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केला होता. याआधीही ते 1996 ते 2001 पर्यंत अफगाणिस्तानात तालिबानचीच सत्ता होती. तालिबानच्या राजवटीत मानवी हक्कांचं उल्लंघन होत असल्याच्या बातम्या वारंवार येत आहेत. हे वाचा - जगातील सर्वात मोठ्या हिऱ्याचा लिलाव, 4.4 अब्ज रुपयांची बोली, ही आहेत वैशिष्ट्यं तालिबानने महिलांच्या शिक्षण आणि रोजगाराच्या अधिकारावरही हल्ला केला आहे. ईदनिमित्त आपल्या कारमध्ये मुलांसाठी भेटवस्तू गोळा करण्यासाठी गेलेल्या शायमा वफा नावाच्या महिलेनं सांगितलं की, “मी स्वतः तालिबानी सुरक्षारक्षकांना सांगितलं की, टॅक्सीमध्ये ड्रायव्हरच्या शेजारी बसण्यापेक्षा मी माझ्या स्वत:च्या कारने जाणं पसंत करते." मात्र, विभागीय माहिती आणि संस्कृती विभागाचे प्रमुख नईम अल हक हक्कानी यांनी सांगितलं की, या संदर्भात कोणताही अधिकृत आदेश जारी करण्यात आलेला नाही.
    Published by:Digital Desk
    First published:

    Tags: Driving license, Taliban

    पुढील बातम्या