मराठी बातम्या /बातम्या /देश /

पाकिस्तानच्या तिजोरीत खडखडाट, अधिकाऱ्यांनी सांगितलं काश्मीरमधील ड्रोन हल्ल्यांमागचं खरं कारण

पाकिस्तानच्या तिजोरीत खडखडाट, अधिकाऱ्यांनी सांगितलं काश्मीरमधील ड्रोन हल्ल्यांमागचं खरं कारण

रत्यक्ष हल्ले करून फारसं काही साध्य होत नाही, हे लक्षात आल्यानंतर पाकिस्तानानं आता ड्रोनचा (Drone Attack) वापर सुरू केल्याचं गेल्या काही दिवसांतील घडामोडींवरून स्पष्ट झालं आहे.

  • Published by:  desk news

श्रीनगर, 25 जुलै : जम्मू आणि काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) दहशतवादी कारवाया करण्याची पाकिस्तानची (Pakistan) खोड अद्यापही जिरत नसल्याचंच दिसून येत आहे. प्रत्यक्ष हल्ले करून फारसं काही साध्य होत नाही, हे लक्षात आल्यानंतर पाकिस्तानानं आता ड्रोनचा (Drone Attack) वापर सुरू केल्याचं गेल्या काही दिवसांतील घडामोडींवरून स्पष्ट झालं आहे. मात्र यामागे पाकिस्तानच्या तिजोरीतील खडखडाट हेच खरं कारण असल्याचं सांगितलं जात आहे.

पाकिस्तानी दहशतवादी संघटनांनी गेल्या महिन्यात काश्मीरमधील एअरफोर्सच्या बेसवर ड्रोनचा वापर करून स्फोट घडवून आणला होता. त्यानंतर भारतानं आपली सुरक्षा व्यवस्था मजबूत केली. त्यानंतरही काश्मीरमध्ये ठिकठिकाणी ड्रोन फिरत असल्याचं लक्षात आल्यावर सुरक्षा यंत्रणांनी ते ड्रोन हाणून पाडले आणि निकामी केले होते. काही ड्रोन तर प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या पलिकडून भारतीय हद्दीत प्रवेश करत असल्याचं दिसल्यावर भारतीय सैनिकांनी त्याच्यावर जोरदार गोळीबार केला होता आणि ते ड्रोन परत गेले होते.

ड्रोनहल्ल्यांमागचं खरं कारण

पाकिस्तानकडील आणि दहशतवादी संघटनांकडील दारुगोळा आणि पैसे संपत चालल्यामुळे त्यांना आता आधुनिक शस्त्रास्त्रं आणि स्फोटकांचा खर्च परवडेनासा झाला आहे, अशी माहिती जम्मू आणि काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंह यांनी माध्यमांना दिली आहे. त्यामुळे आता कमी खर्चात उडू शकणाऱ्या ड्रोनचा वापर दहशतवादी संघटना करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. नुकताच भारतीय सुरक्षा यंत्रणांनी आणखी एक ड्रोन हाणून पाडला आहे आणि तो निकामी केला आहे. त्यात दोन जीपीएस आणि आयईडी बसवण्यात आल्याचं फॉरेन्सिक चाचणीतून समोर आलं आहे.

हे वाचा -अफगाणिस्तानातली स्थिती चिंता वाढवणारी; भारतीय पत्रकारांसाठी सूचना जारी

शस्त्रसंधीचं उल्लंघन

यावर्षी फेब्रुवारी महिन्यात भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी झाली होती. त्यानंतर प्रत्यक्ष सीमेवरील कारवाया कमी झाल्या असल्या तरी ड्रोनच्या माध्यमातून पाकिस्तानकडून होणारे हल्ले सुरुच आहेत. ही बाब अत्यंत गंभीर असून ड्रोनच्या मार्फत होणारे हल्ले हेदेखील शस्त्रसंधीचं उल्लंघन असल्याचं दिलबाग सिंह यांनी म्हटलं आहे.

First published:

Tags: Jammu and kashmir, Pakistan