हिमाचल प्रदेश, 25 जुलै: हिमाचल प्रदेशातील किन्नौर (Kinnaur) जिल्ह्यात दरड कोसळली (Landslide) आहे. किन्नौर जिल्ह्यातील बटसेरी येथे दरड कोसळून थेट गाडीवर पडला. पर्यटकांच्या गाडीवर दरड कोसळून झालेल्या या दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला आहे तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी नागरिकांना उपचारासाठी तात्काळ सीएचसी सांगला येथे हलविण्यात आले आहे.
#WATCH | Himachal Pradesh: Boulders roll downhill due to landslide in Kinnaur district resulting in bridge collapse; vehicles damaged pic.twitter.com/AfBvRgSxn0
— ANI (@ANI) July 25, 2021
रायगडमधील दरड कोसळतानाचा LIVE VIDEO
या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. तात्काळ मदत आणि बचावकार्य सुरू केले, जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पीडित नागरिक हे पर्यटक होते आणि दिल्ली, चंडीगड येथून हिमाचल प्रदेशात फिरण्यासाठी आले होते.
I spoke to the Kinnaur district administration and inquired about the accident. The administration has started rescue operation at the spot & immediate relief is being provided there. I pray to God for speedy recovery of the injured: Himachal Pradesh CM Jairam Thakur pic.twitter.com/5oxHegLzv0
— ANI (@ANI) July 25, 2021
दरड कोसळल्यानंतर बास्पा नदीवर बांधण्यात आलेला पूल तुटला आहे आणि त्यामुळे गवाचा संपर्क तुटला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भूस्खलन झाल्याने मोठ्या प्रमाणात दरड कोसळली आणि ही सर्व दरड रस्त्यांवरील गाडीवर आली. भलीमोठी दगड असल्याने गाड्यांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
हिमाचलचे मुख्यमंत्री जयराम सिंह ठाकूर यांनी या घटनेनंतर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट करत म्हटलं, "किन्नौरच्या बत्सेरी येथे दरड कोसळून झालेली दुर्घटना खूपच दु:खद आहे. या दुर्घटनेत 9 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. ही घटना अत्यंत दु:खद आहे."
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: India, Monsoon, Rain flood, Rescue operation