Home /News /videsh /

Imran Khan यांची विकेट पडणार की बॅटिंग सुरू राहणार? Pakistan च्या संसदेत आज अविश्वास प्रस्तावावर चर्चा

Imran Khan यांची विकेट पडणार की बॅटिंग सुरू राहणार? Pakistan च्या संसदेत आज अविश्वास प्रस्तावावर चर्चा

Pakistan Power Tussle: पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर, सिंधचे कृषी मंत्री आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी (PPP) नेते मंजूर वासन यांनी पाकिस्तान मुस्लिम लीग (PML-N) चे अध्यक्ष शाहबाज शरीफ पंतप्रधान होतील अशी भविष्यवाणी केली आहे.

पुढे वाचा ...
  इस्लामाबाद, 25 मार्च : पाकिस्तानच्या संसदेत (Pakistan National Assembly) आज (शुक्रवार) इम्रान खान सरकारच्या विरोधात आणलेल्या अविश्वास ठरावावर मतदान (No Trust Vote) केव्हा होणार याचा निर्णय घेईल. पाकिस्तानच्या राज्यघटनेनुसार अविश्वास ठराव मांडल्याच्या 3 दिवसांनंतर आणि 7 दिवसांच्या आत मतदान होणं आवश्यक आहे. पाकिस्तानातील सत्तेचे आकडे बघितले तर इम्रान यांना यापूर्वी 176 खासदारांचा पाठिंबा होता. मात्र 24 खासदारांच्या बंडखोरीनंतर आता केवळ 152 खासदार इम्रान सरकारच्या पाठीशी उभे आहेत. म्हणजेच 342 सदस्यांच्या संसदेत 172 च्या आकड्यापासून इम्रान खान खूपच मागे आहेत. पाकिस्तानी लष्कराला काय हवंय? या प्रकरणात पाकिस्तानी लष्कर तटस्थ असल्याचं सांगण्यात येत होतं. परंतु, आता असं वृत्त आहे की, देशाची खराब अर्थव्यवस्था पाहता, लष्कराला देशात सर्व पक्षांच्या युतीचं सरकार बनवायचं आहे. मात्र, इम्रान खान यासाठी तयार नसल्याचं सांगितलं जातंय. हे वाचा - Russia-Ukraine War: युक्रेनच्या मदतीला धावून आला ब्रिटन, 6000 क्षेपणास्त्रं आणि आर्थिक मदतही करणार
   काही दिवसांपूर्वी 'द जंग' वृत्तपत्रात अब्बासी यांचा एक लेख प्रसिद्ध झाला होता. त्यात ते म्हणाले होते 'देश सध्या अत्यंत कठीण परिस्थितीत आहे. राजकारणी देशाच्या भल्याऐवजी केवळ स्वतःवर लक्ष केंद्रित करत आहेत. अशा वेळी, लष्करानं हस्तक्षेप करायला हवा.'
  संसदेचे अध्यक्ष (Speaker) असद कैसर यांना इम्रान यांच्या इशाऱ्यानुसार मतदान पुढं ढकलायचं आहे. तर, विरोधकांना समोर विजय दिसत आहे. त्यामुळं त्यांना यावर लवकरात लवकर निर्णय हवा आहे. हे वाचा - Sri Lanka Economic Crisis : एकेकाळची सोन्याची लंका दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर, दुधासाठी मोजावे लागतायत तब्बल 790 रुपये शाहबाज शरीफ पुढील पंतप्रधान होऊ शकतील पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर, सिंधचे कृषी मंत्री आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी (PPP) नेते मंजूर वासन यांनी पाकिस्तान मुस्लिम लीग (PML-N) चे अध्यक्ष शाहबाज शरीफ पंतप्रधान होतील अशी भविष्यवाणी केली आहे. इम्रान यांनी विरोधी पक्षांना म्हटलंय चोर, डाकू इम्रान खान यांचा पक्ष तेहरीक-ए-इन्साफनं (PTI) अविश्वास प्रस्तावावर मतदान करण्यापूर्वी आपल्या नाराज मित्रपक्षांशी बोलणी करण्यास सुरुवात केली आहे. पीटीआयच्या शिष्टमंडळानं मुत्ताहिदा क्वामी मूव्हमेंट (MQM) च्या नेत्यांची भेट घेतली. दरम्यान, इम्रान यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांना चोर आणि डाकू म्हटलंय. ते म्हणाले 'मी शरीफ किंवा झरदारी यांच्याशी हातमिळवणी करणार नाही. अशा भ्रष्ट लोकांच्या पाठीशी उभं राहणं मला आवडत नाही.'
  Published by:Digital Desk
  First published:

  Tags: Pak pm Imran Khan, Pakistan army

  पुढील बातम्या