दिल्ली, 15 ऑगस्ट : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या 73 व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने लाल किल्ल्यावरून भाषण करताना अनेक मुद्द्यांवर प्रकाश टाकला. त्यातला एक होता - डिजिटल व्यवहारांना चालना देण्याबाबतचं धोरण. मोदी सरकारने रोख व्यवहारांऐवजी डिजिटल व्यवहारांवर भर देण्याची घोषणा केली आहे. याचा अर्थ कॅश ट्रान्झॅक्शनचे काही नियम सरकारने अधिक कडक करण्याचं ठरवलं आहे. रोख व्यवहारांबाबत या 7 गोष्टी लक्षात ठेवा, कारण या नियमांचं पालन केलं नाहीत, तर भरभक्कम दंड आकारला जाऊ शकतो. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची नोटिस तुम्हाला येऊ शकते. १. घरात किती कॅश ठेवू शकता? तुमच्या घरात एका वेळी किती रोख रक्कम तुम्ही ठेवू शकता, यावर बंधन नसलं तरी ही कॅश कुठून आली याचं स्पष्टीकरण तुमच्याकडे असलं पाहिजे. कॅश सोर्स सांगण्याचं बंधन आहे. तुमच्याकडे असलेल्या कॅशचं कुठलंही पटेल असं स्पष्टीकरण देऊ शकला नाहीत तर त्यावर 137 टक्के पेनल्टी द्यावी लागू शकेल. २. बँक खात्यातून किती पैसे काढू शकता? त्यावर टॅक्स लागतो का? सध्या तरी स्वतःच्या बँक खात्यातून कितीही पैसे काढले तरी त्यावर टॅक्स लागत नाही. पण 5 जुलैला सादर झालेल्या बजेटमध्ये बँकेतून रोख रक्कम काढण्यासंदर्भात एक घोषणा झाली आहे. त्यानुसार 1 कोटीहून अधिक रक्कम काढली तर 2 टक्के TDS द्यावा लागणार आहे. हेही वाचा : देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी मोदी सरकारचा हा आहे मास्टरप्लॅन ३. बँकेत पैसे ठेवायचं काही लिमिट आहे का? बँकेत एका वेळी किती कॅश जमा करावी याबाबत बंधन नाही. पण ती कॅश कुठून आली याचं समाधानकारक स्पष्टीकरण देता आलं पाहिजे. सेव्हिंग अकाउंटमध्ये 50000 पेक्षा जास्त कॅश जमा केलीत तर पॅन कार्ड नंबर देणं बंधनकारक आहे. ४. करंंट अकाउंटचा काय नियम एका वर्षात 10 लाखांहून अधिक रक्कम सेव्हिंग खात्यात जमा केली तर अॅन्युअल इन्फॉर्मेशन रिपोर्टमध्ये केस जाईल. करंट अकाउंटमध्ये 50 लाख रुपयांहून अधिक रक्कम जमा झाली, तर इन्कम टॅक्स विभागाचं लक्ष तुमच्याकडे थेट असेल. ५. प्रॉपर्टीचे व्यवहार रोखीने करण्यास बंदी जागा, प्रॉपर्टी खरेदी विक्रीचे व्यवहार पारदर्शी असणं आवश्यक आहे. जर 20,000 रुपयांपेक्षा जास्त कॅशची देवाण घेवाण झाली तर 100 टक्के पेनल्टी आकारली जाऊ शकते. ६. डोनेशन कॅशमध्ये देऊ शकतो का? दानाची रक्कम रोखीने देण्यावर बंधन आहे. एका वेळी जास्तीत जास्त 2000 रुपये रोख तुम्ही दान म्हणून देऊ शकता. यापेक्षा जास्त रक्कम कॅशने दिलीत तर 80 G खाली मिळणारी करसवलत त्यावर मिळणार नाही. हे वाचा - घरी ठेवलेल्या सोन्यातून करा मोठी कमाई, ‘ही’ आहे SBI ची स्कीम हेच पैसे जर चेक, डीडी किंवा ऑनलाईन ट्रान्सफर केलेत तर सवलत मिळेल. ७. लग्नाचा खर्च रोखीत करू शकतो का? लग्नाच्या खर्चाचे सगळे व्यवहार रोखीने करायला अडचण नाही. त्यावर कुठलं बंधन नाही. पण कुठल्या एकाच व्यावसायिकाकडून 2 लाखांहून अधिक रकमेची खरेदी केलीत तर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये तुमचं नाव जाईल. ते तुमच्या रोखीच्या पैशाच्या स्रोताबद्दल चौकशी करू शकतात. समाधानकारक उत्तर देता आलं नाही तर या रकमेवर 78 टक्के पेनल्टी आणि व्याज दोन्ही लागू शकतं. ८. भेट म्हणून रोख रक्कम देता येते? इन्कम टॅक्स एक्सपर्ट सांगतात की, 2 लाखांपेक्षा कमी रक्कम असेल तर रोख पैसे भेट गिफ्ट म्हणून देऊ शकला. पण त्यापेक्षा अधिक पैसे गिफ्ट म्हणून कॅशमध्ये दिलेत तर 100 टक्के पेनल्टी लागू शकते. ९.नातेवाईकांखेरीज मित्रांना भेट म्हणून कॅश देऊ शकतो का? फक्त नातेवाईकांनाच तुम्ही भेट म्हणून 2 लाख रुपयांपर्यंतची रक्कम रोखीने देऊ शकता. नातेवाईकांची व्याख्या इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने निश्चित केली आहे. या व्याख्येत न बसणारे इतरांना 50000 पेक्षा जास्त रक्कम रोखीने गिफ्ट म्हणून देऊ शकत नाहीत, असं टॅक्स एक्सपर्ट सांगतात. —————————————————– VIDEO : ‘तू देश मेरा’ पुलवामा हल्ल्यातील शहिदांसाठी हे गाणं पाहिलं का?
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.