Home /News /videsh /

पाक पंतप्रधान इम्रान खान यांची खुर्ची धोक्यात! बंडखोरांनंतर आता बिलावल भुत्तो यांच्याकडून धमकी

पाक पंतप्रधान इम्रान खान यांची खुर्ची धोक्यात! बंडखोरांनंतर आता बिलावल भुत्तो यांच्याकडून धमकी

PTI चे सभागृहात 155 सदस्य आहेत आणि सरकार स्थिर राहण्यासाठी त्यांना किमान 172 खासदारांची गरज आहे. पक्षाला सहा राजकीय पक्षांतील 23 सदस्यांचा पाठिंबा आहे. विरोधी पक्षांचे 162 खासदार आहेत. इम्रान यांचे जवळचे त्यांच्या विरोधात गेले, तर इम्रान यांना खुर्ची वाचवणं शक्य होणार नाही.

पुढे वाचा ...
    इस्लामाबाद, 19 मार्च : पाकिस्तानच्या राजकारणात तीव्र उलथापालथ सुरू आहे. इम्रान सरकारविरोधात (Pak PM Imran Khan) विरोधकांनी आघाडी उघडली आहे. यानंतर त्यांच्या पक्षातील अनेक नेत्यांनीही बंडखोरी वृत्ती स्वीकारली आहे. दरम्यान, आता पाकिस्तान पीपल्स पार्टीचे (पीपीपी) नेते बिलावल भुट्टो झरदारी (Bilawal Bhutto Zardari) यांनी 21 मार्च रोजी होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनादरम्यान अविश्वास ठराव (No Confidence Vote) न दिल्यास ते आणि पक्षाचे इतर नेते सभागृहाबाहेर पडतील, असं स्पष्ट केलं आहे. याशिवाय, ओआयसी (ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन) अधिवेशनही होणार नाही. भुट्टो म्हणाले की, नॅशनल असेंब्लीच्या अध्यक्षांनी 21 मार्च रोजी अविश्वास प्रस्ताव आणला नाही तर विरोधी पक्षाचे नेते आणि समर्थक रस्ते अडवतील आणि सुरक्षेच्या अडचणीमुळे ओआयसी परिषद आयोजित करू नये असा निर्णय घेतील. दरम्यान, सत्ताधारी पीटीआयने 14 असंतुष्ट खासदारांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. खासदारांना पंतप्रधान इम्रान खान यांच्यासमोर हजर राहण्यासाठी सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे. इम्रान खान सरकारच्या लष्करासोबतच्या संबंधांमध्ये दुरावा निर्माण झाला असून 28 मार्च रोजी इम्रान सरकारविरोधात अविश्वास प्रस्तावाची चाचणी होणार आहे. यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत १- नूर आलम खान 2- डॉ.मुहम्मद अफजलखान धांदला 3- नवाब शेर 4- राजा रियाझ अहमद 5- अहमद हुसेन देहर ६- राणा मुहम्मद कासिम नून ७- मुहम्मद अब्दुल गफार वट्टू 8- मखदूम झादा सय्यद बासित अहमद सुलतान 9- अमीर तलाल गोपांग 10- ख्वाजा शेराज मेहमूद 11- सरदार रियाझ महमूद खान मजारी 12- वजीहा कमर 13- नुजहत पठाण 14- रमेशकुमार वांकवाणी हे वाचा - पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांच्या खुर्चीवर अंतर्गत बंडाळीची टांगती तलवार फवाद खान म्हणाले, 'पश्चात्तापाचे दरवाजे खुले आहेत' येथे माहिती मंत्री फवाद खान म्हणाले की, सरकार पडणार नाही. पाकिस्तानमध्ये इम्रान खान यांच्याशिवाय लोकशाही शक्य नाही. आम्ही अजूनही लोकांना परत येण्याचं आवाहन करतो. "पश्चात्तापाचे दरवाजे खुले आहेत." ज्यांना इम्रान खानच्या बाजूनं मतदान करायचे नाही ते आपल्या जागेचा राजीनामा देऊ शकतात. अशा परिस्थितीत पंतप्रधानांना ब्लॅकमेल करून चालणार नाही. हे वाचा - युक्रेनवर डागलेलं क्षेपणास्त्र हिरोशिमावर पडलेल्या अणुबॉम्बपेक्षाही शक्तिशाली बहुमताचा आकडा 172 आहे PTI चे सभागृहात 155 सदस्य आहेत आणि सरकार स्थिर राहण्यासाठी त्यांना किमान 172 खासदारांची गरज आहे. पक्षाला सहा राजकीय पक्षांतील 23 सदस्यांचा पाठिंबा आहे. विरोधी पक्षांचे 162 खासदार आहेत. इम्रान यांचे जवळचे त्यांच्या विरोधात गेले, तर इम्रान यांना खुर्ची वाचवणं शक्य होणार नाही. पाकिस्तानच्या संसदेत 342 खासदार आहेत.
    Published by:Digital Desk
    First published:

    Tags: Pak pm Imran Khan, Pakistan

    पुढील बातम्या