नवी दिल्ली, 15 ऑक्टोबर : केंद्रीय मंत्री अमित शाहांनी दिलेल्या सर्जिकल (Pakistan’s reply on surgical strike statement of Amit Shah) स्ट्राईकच्या बातमीनंतर पाकिस्तानचे धाबे दणाणले आहेत. जर जम्मू काश्मीरमधील अतिरेकी कारवायांना पाकिस्तानातून मिळणारे समर्थन आणि सहकार्य थांबलं नाही, तर पुन्हा (Amit Shah warns of surgical strike) एकदा सर्जिकल स्ट्राईक होऊ शकतो, असा इशारा केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी दिला होता. त्यावर आता पाकिस्ताननं आपली प्रतिक्रिया दिली असून आम्ही शांतताप्रिय आहोत, असं म्हटलं आहे.
काय आहे प्रतिक्रिया
केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी सर्जिकल स्ट्राईकचा इशारा दिला असली तरी आम्ही शांतताप्रिय असल्याचं पाकिस्ताननं म्हटलं आहे. भारताकडून कुठलीही आक्रमक पावलं उचलली गेली, तर असे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, असंदेखील पाकिस्तानननं म्हटलं आहे. पाकिस्ताननच्या परराष्ट्र मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात अमित शाह यांचं वक्तव्य सर्जिकल स्ट्राईकला प्रोत्साहन देणारं, हिंसेला प्रवृत्त करणारं आणि बेजबाबदार असल्याचं पाकिस्ताननं म्हटलं आहे.
भाजप-संघावर टीका
केंद्रीय मंत्री अमित शाह यांचं विधान हे भाजप आणि संघाची विचारधारा दाखवणारं आणि आशिया खंडातील शांततेला आव्हान देणारं असल्याचं पाकिस्ताननं म्हटलं आहे. पाकिस्तानला जाणीवपूर्वक उकसवण्याचा हा प्रयत्न असून आम्ही नेहमीच शांततेचं समर्थन करत आलो आहोत, अशी प्रतिक्रिया पाकिस्ताननं दिली आहे.
काय आहे प्रकरण?
काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत. भारतीय सैन्य आणि जम्मू काश्मीर पोलीस बहुतांश कारवाया हाणून पाडत असले, तरी पाकिस्तानपुरस्कृत संघटना कारवाया कमी करत नसल्याचं चित्र आहे. या पार्श्वभूमीवर जर कारवाया थांबल्या नाहीत, तर त्याच शब्दात उत्तर देण्याचा इशारा केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी दिला आहे.
हे वाचा -सिंघु बॉर्डरवर हात कापून बॅरिकेटवर लटकवला तरुणाचा मृतदेह
करून दिली 2016 ची आठवण
पाकिस्तानला इशारा देताना अमित शाह यांनी 2016 ची आठवण करून दिली आहे. त्यावेळी पंतप्रधान मनमोहन सिंह आणि दिवंगत संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक कऱण्यात आला होता. भारतावर हल्ला करणे, सीमेवर कारवाया करणे आणि घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणे या बाबी खपवून घेतल्या जाणार नाहीत, हा इशारा देण्याचा प्रयत्न भारताने केला होता. पुन्हा जर पाकिस्तानकडून तशाच प्रकारची आगळीक होत असेल, तर भारताकडून पुन्हा एकदा कारवाई केली जाऊ शकते, असं अमित शाह यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Amit Shah, India vs Pakistan, Pakistan