कराची, 29 जानेवारी : पाकिस्तानातून एक भीषण अपघात झाला आहे. आज (दि.29) रविवारी पहाटे दक्षिण-पश्चिम पाकिस्तानमधील लासबेला जिल्ह्यातील बेला भागात एक वेगवान प्रवासी बस रस्त्यावरून घसरली आणि दरीत कोसळली. या अपघातात 37 जणांचा मृत्यू झाला असून 4 जण जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्य सुरू आहे.
बीबीसीने दिलेल्या माहितीनुसार, बस वेगात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. खड्ड्यात पडल्यानंतर बसला आग लागल्याने क्षणात होत्याच नव्हत झाले. 18 लोकांचा जागेवरच मृत्यू झाल्याची माहिती आहे. याबाबत बेला परिसराचे सहाय्यक आयुक्तांनी म्हणाले कराचीला जाणाऱ्या बसचा हा अपघात झाला आहे. दरम्यान बस दरीत कोसळताच मोठी आग लागल्याने ही मोठी घटना घडली.
हे ही वाचा : बहिणीची हत्या केली अन् रक्तानं माखलेला कोयता घेऊन गावभर फिरला; कोल्हापुरात खळबळ
बसमध्ये किमान 48 प्रवासी होते, बचाव कार्य सुरू असून जखमींना बाहेर काढले जात असल्याचा दावा प्राथमिक अहवालात करण्यात आला आहे. बचावकार्य सुरू असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
जखमींना लासबेला येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अग्निशमन दलाचे जवान, बचावकर्ते आणि सुरक्षा कर्मचारी अपघातस्थळी उपस्थित आहेत. स्थानिक लोकही बचावकार्यात मदत करत आहेत.
हे ही वाचा : Video : डोक्यात ऑक्सिजन सिलिंडर पडून चिमुकल्याचा जागीच मृत्यू; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
जखमी आणि मृतदेह बाहेर काढल्यानंतर यंत्रसामग्रीचा वापर करून बस खड्ड्यातून काढण्याचा प्रयत्न केला जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. पोलिसांनी हा अपघात ओव्हरस्पीडिंगमुळे झाला असल्याचे सांगितले. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी मोठी गर्दी केली होती. या घटनेची तिव्रता पाहून काही लोक आश्चर्यचकित झाले होते. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी मदतीसाठी धावले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Accident, Major accident, Pakisatan, Road accident