मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Video : डोक्यात ऑक्सिजन सिलिंडर पडून चिमुकल्याचा जागीच मृत्यू; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

Video : डोक्यात ऑक्सिजन सिलिंडर पडून चिमुकल्याचा जागीच मृत्यू; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

खेळत असताना ऑक्सिजनचे सिलिंडर डोक्यात पडल्याने एका नऊ वर्षीय बालकाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

खेळत असताना ऑक्सिजनचे सिलिंडर डोक्यात पडल्याने एका नऊ वर्षीय बालकाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

खेळत असताना ऑक्सिजनचे सिलिंडर डोक्यात पडल्याने एका नऊ वर्षीय बालकाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Osmanabad, India

उस्मानाबाद, 29 जानेवारी, बालाजी निरफळ : उस्मानाबादमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. खेळत असताना ऑक्सिजनचे सिलिंडर डोक्यात पडल्याने एका नऊ वर्षीय बालकाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. ही घटना उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी शहरामध्ये घडली आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. आर्यन अमर नलवडे वय नऊ वर्ष असे मृत्यूमुखी पडलेल्या बालकाचे नाव आहे. आर्यन हा वाशी शहरातील एका खासगी हॉस्पिटल समोर खेळत होता .त्यावेळी त्या ठिकाणी ठेवलेले ऑक्सिजनचे सिलिंडर आर्यन याच्या डोक्यात पडले आणि यामध्ये त्याचा मृत्यू झाला.

नातेवाईक आक्रमक 

खेळत असताना ऑक्सिजनचे सिलिंडर आर्यनच्या डोक्यात पडले. गंभीर दुखापत झाल्यानं या घटनेत त्याचा मृत्यू झाला आहे. ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. दरम्यान या घटनेनंतर आर्यन याचे नातेवाईक आक्रमक झाले आहेत. रुग्णालयाच्या समोर ठेवण्यात आलेले ऑक्सिजनचे सिलिंडर अत्यंत बेजबाबदारपणे ठेवण्यात आले होते, असा आरोप नातेवाईकांकडून करण्यात आला आहे.

व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

दरम्यान या प्रकरणात रुग्णालयाच्या व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी आर्यनच्या नातेवाईकांकडून करण्यात येत आहे. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे.  त्यानंतर प्रशासनाने मध्यस्ती केल्यानं हा वाद मिटला. मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

First published:

Tags: Osmanabad