मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /बहिणीची हत्या केली अन् रक्तानं माखलेला कोयता घेऊन गावभर फिरला; कोल्हापुरात खळबळ

बहिणीची हत्या केली अन् रक्तानं माखलेला कोयता घेऊन गावभर फिरला; कोल्हापुरात खळबळ

कोल्हापूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. हत्येच्या घटनेनं कोल्हापूर हादरलं आहे. तरुणाने आपल्याच सख्खा बहिणीची हत्या केली आहे.

कोल्हापूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. हत्येच्या घटनेनं कोल्हापूर हादरलं आहे. तरुणाने आपल्याच सख्खा बहिणीची हत्या केली आहे.

कोल्हापूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. हत्येच्या घटनेनं कोल्हापूर हादरलं आहे. तरुणाने आपल्याच सख्खा बहिणीची हत्या केली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Kolhapur, India

कोल्हापूर, 28 जानेवारी, ज्ञानेश्वर साळुंखे : कोल्हापूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. हत्येच्या घटनेनं कोल्हापूर हादरलं आहे.  तरुणाने आपल्याच सख्खा बहिणीची हत्या केली. त्यानंतर त्याने तिथे पडलेल्या पोत्यावर रक्ताने गीता-प्रताप असं लिहीलं आहे. सध्या पोलिसांकडून या महिलेच्या मृतदेहाचा शोध सुरू असून, अद्याप मृतदेह सापडलेला नाहीये. रक्ताने माखलेला कोयता हातात घेऊन फिरणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून, त्याची चौकशी सुरू आहे. हा तरुण दारूच्या नशेत असून, दारूच्या नशेत बहिणीची हत्या केली असावी असा प्राथमीक अंदाज वर्तवण्यात येत आहे. आजच्या दिवसामधील ही कोल्हापूर जिल्ह्यातील दुसरी हत्येची घटना आहे.

हत्येचं गूढ वाढलं 

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, एका तरुणाने आपण बहिणीची हत्या केल्याचा दावा केला आहे. हा तरुण दारूच्या नशेत आहे. रक्ताने माखलेला कोयता हातात घेऊन फिरणाऱ्या या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सध्या पोलिसांकडून तरुणाने दावा केलेल्या मृत महिलेचा शोध घेणं सुरू आहे. या तरुणाने तिथे पडलेल्या पोत्यावर रक्तानं  गीता-प्रताप असं लिहीलं आहे. दारूच्या नशेत तरुणानं हे कृत्य केलं असावं असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. सध्या या तरुणाची चौकशी सुरू असून, त्याने हत्या का केली? पोत्यावर रक्तानं गीता प्रताप असं नाव त्यानं का लिहीलं याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

पत्नीची हत्या  

दरम्यान कोल्हापूरमध्ये आज आणखी एक हत्येची घटना घडली आहे. मुलाच्या हव्यासापोटी पत्नीचा खून करण्यात आला आहे. करवीर तालुक्यातील दोनवडे येथील या घटनेने खळबळ उडाली आहे. पतीने पत्नीची हत्या करुन विजेचा शॉक लागल्याचा बनाव केला होता. दोन मुली झाल्याने पत्नीचा पतीकडून छळ सुरू होता. अखेर पतीने आपल्या पत्नीची हत्या केली. आश्विनी एकनाथ पाटील यांचा मारहाणीत मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर पती एकनाथ पाटील याला पोलिसांनी अटक केली आहे.

First published:

Tags: Kolhapur