अखेर कोरोना रुग्णांचा जीव वाचवणारं पहिलं औषध सापडलं! WHOनं केलं 'या' देशाचं कौतुक

अखेर कोरोना रुग्णांचा जीव वाचवणारं पहिलं औषध सापडलं! WHOनं केलं 'या' देशाचं कौतुक

पहिल्यांदाच जागतिक आरोग्य संघटना (WHO) कोरोना रुग्णांचा जीव वाचवणारं औषध सापडलं असल्याचं सांगितलं आहे.

  • Share this:

लंडन, 17 जून : जगभरात कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. दुसरीकडे कोरोनावर अद्याप लस शोधता आलेली नाही आहे. काही देशांनी यशस्वी ह्युमन ट्रायल केलं आहे. मात्र पहिल्यांदाच जागतिक आरोग्य संघटना (WHO) कोरोना रुग्णांचा जीव वाचवणारं औषध सापडलं असल्याचं सांगितलं आहे. ब्रिटेनच्या ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीत डेक्सामेथासोन (dexamethasone) औषधाचा वापर करून 2000 रूग्णांवर उपचार करण्यात आला. या चाचणीत असे आढळले की हे औषध बर्‍याच रुग्णांचा जीव वाचवण्यात यशस्वी ठरले आहे.

संशोधकांचे म्हणणे आहे की डेक्सामेथासोन हे असे पहिले औषध आहे जे कोरोना रूग्णांचे प्राण वाचविण्यात यशस्वी ठरले आहे. डेक्सामेथासोन या औषधाने कोरोना रूग्णांवर उपचार करण्यास ब्रिटन सरकारनं मान्यता दिली आहे. हे एक जुने आणि स्वस्त औषध आहे.

प्रमुख संशोधक प्रो. मार्टिन लँड्रे यांच्या मते, जेथे योग्य असेल तेथे रुग्णांना आता कोणताही उशीर न करता हे औषध द्यावे. मात्र लोकांनी हे औषधे स्वत: खरेदी करुन घेऊ नये, डॉक्टरांच्या परवानगीनेच हे औषध घ्यावे.

वाचा-लस घेतल्यानंतरही कोरोनाचा धोका? शास्त्रज्ञांनी व्यक्त केली चिंता

डेक्सामेथासोन औषध विशेषत: व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांवर उपायकारक आहे. अद्याप सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांमध्ये या औषधाचा कितपत फायदा होत आहे, याबाबत संशोधन झालेले नाही. WHOचे महासंचालक टेड्रॉस अॅडहॅनम घेब्रियेसुस यांनी या औषधाचे कौतुक केले आहे. ते म्हणाले की, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरवर असणाऱ्या रुग्णांसाठी हे औषध जीवनदान ठरू शकते. ही खूप चांगली बातमी आहे. मी ब्रिटन सरकार, ऑक्सफोर्ड विद्यापीठ आणि इतरांचे अभिनंदन करतो.

वाचा-'या' देशाच्या लसीचं ट्रायल यशस्वी, 14 दिवसांत टळू शकतो मृत्यूचा धोका

ट्रायल दरम्यान, असे आढळले की व्हेंटिलेटरवर असलेल्या रूग्णांना हे औषध दिल्यास मृत्यूचा धोका एक तृतीयांश कमी झाला आहे. तर, जे रुग्ण ऑक्सिजनवर आहेत, त्यांच्या मृत्यूचे प्रमाण 1/5 ने कमी झाले आहे. संशोधकांचा असा अंदाज आहे की जर आधी हे औषध ब्रिटनमध्ये उपलब्ध असते तर 5000 लोकांचा जीव वाचला असता. प्रमुख संशोधक प्रो. मार्टिन लँड्रे यांनी या अभ्यासाचा हवाला देत म्हटले आहे की हे औषध व्हेंटिलेटरवर असलेल्या प्रत्येकी 8 रुग्णांपैकी एकाचे प्राण वाचवते. त्याच वेळी, ऑक्सिजन समर्थनासह प्रत्येक 20-25 रुग्णांपैकी एकाचे प्राण वाचविण्यात हे औषध यशस्वी झाले आहे.

लवकरच मिळणार लस

चीनच्या सिनोवॅक बायोटेक लिमिटेड (Sinovac Biotech Ltd) या औषधी कंपनीनं एक चांगली बातमी दिली आहे. या कंपनी मार्फत तयार करण्यात आलेल्या लसीनं मानवी चाचण्यांचा टप्पा पार केला आहे. कंपनीने म्हटलं आहे की या लसीमुळे कोरोना विषाणूविरूद्ध लढण्यासाठी शरीरातील प्रतिकार शक्ती वाढेल. या लसीला 'कोरोनावॅक' असं नाव देण्यात आलं आहे. या लसीच्या चाचणीत कोणतेही धोकादायक परिणाम दिसलेले नाहीत, असे कंपनीचं म्हणणं आहे.

वाचा-देशातील मृतांचा आकडा 12 हजारांच्या घरात, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर

संपादन-प्रियांका गावडे.

First published: June 17, 2020, 11:10 AM IST

ताज्या बातम्या