लस घेतल्यानंतरही कोरोनाचा धोका? शास्त्रज्ञांनी व्यक्त केली चिंता

लस घेतल्यानंतरही कोरोनाचा धोका? शास्त्रज्ञांनी व्यक्त केली चिंता

सुरुवातीला येणारी कोरोनाविरोधी लस आजारावर प्रभावी ठरेल मात्र कदाचित संसर्ग रोखू शकणार नाही असं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे.

  • Share this:

मुंबई, 16 जून : कोरोनाव्हायरसवरील लस (coronavirus vaccine) कधी येईल याची प्रतीक्षा प्रत्येकाला आहे. जगभरात या लसींची चाचणी सुरू आहे. काही लसी नुकत्याच विकसित झाल्यात, काही लसींचं प्राण्यांवर ट्रायल सुरू आहे तर काही लसी ह्युमन ट्रायलपर्यंत पोहोचल्यात. मोजक्या लसींनी चाचणीचा पहिला आणि दुसरा टप्पाही यशश्वीरित्या पार केला आहे. त्यामुळे काही महिन्यांतच कोरोनाविरोधी लस बाजारात येईल, असा दावाही लस तयार करण्याऱ्या कंपन्यांनी केला आहे. अशात आता शास्त्रज्ञांनी चिंता वर्तवली आहे, ती म्हणजे ही लस कोरोनाव्हायरसवर प्रभावी ठरेल मात्र कदाचित कोरोनाची लागण होण्याचा धोका रोखू शकणार नाही.

ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार सुरुवातीला तयार होणारी ही लस कोरोनाव्हायरसपासून कदाचित संरक्षण देऊ शकणार नाही, असं शास्त्रज्ञ म्हणालेत.

हे वाचा - कोरोनाच्या परिस्थितीत 'या' सवयी बदला; नाहीतर पडतील महागात

लंडनमधील इंपिरिअल कॉलेजचे (Imperial College London) प्राध्यापक रॉबिन शॅटॉक यांनी सांगितलं, "लवकरात लवकर बाजारात येणाऱ्या कोरोनाविरोधी लसीच्या काही मर्यादा असतील. ही लस कोरोना रुग्णाला आजाराच्या गंभीर अवस्थेपर्यंत जाण्यापासून रोखेल तसंच रुग्णाचा मृत्यू होण्यापासूनही वाचवले. मात्र आजार होण्यापासून कदाचित रोखणार नाही"

हे वाचा - सावधान! तुमच्या घरात तर नाही आहे विषारी सॅनिटायझर? CBI नं केलं अलर्ट

वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीतील शास्त्रज्ञ माइकल किंच म्हणाले, "आधीच लक्षणं न दिसणाऱ्या कोरोना रुग्णांमुळे संक्रमण वाढतं आहे. अशात लस घेतल्यानंतर लोकांना वाटेल आपण व्हायरसपासून सुरक्षित आहोत आणि ते घराबाहेर पडतील आणि अशा लोकांना कोरोनाव्हायरसची लागण झाली, त्यांच्यामध्ये सौम्य लक्षणं असतील तर त्यांना आपल्याला हा आजार झाला आहे, हे समजणारदेखील नाही आणि अशा परिस्थितीत ते व्हायरसचे वाहक ठरतील आणि मोठ्या प्रमाणात व्हायरस पसरेल"

रोज एक लाखांहून अधिक नवे रुग्ण वाढणार

जगभरात कोरोनाचा कहर सुरूच आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं ((WHO) कोरोनाच्या (coronavirus) पार्श्वभूमीवर इशारा दिला आहे. आशिया, दक्षिण अमेरिका आणि मध्य पूर्व देशांमध्ये कोरोनाचं थैमान कायम राहणार असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेकडून सांगण्यात आलं आहे. मागच्या काही दिवसांमध्ये वेगानं रुग्णाच्या संख्येत वाढ होत आहे. 15 दिवसांमध्ये जवळपास रोज 1 लाखहून अधिक नवीन रुग्णांना लागण झाल्याचं समोर येत आहे. पुढचे दोन आठवडे अशीच स्थिती कायम राहिल असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) दिला आहे.

संकलन, संपादन - प्रिया लाड

हे वाचा - कोरोनामुक्त देशात पुन्हा घुसला कोरोना! एका अंत्यविधीनं वाढवली चिंता

First published: June 16, 2020, 3:23 PM IST

ताज्या बातम्या