नवी दिल्ली, 17 जून : देशात कोरोनाबाधितांचा आणि मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. आज सलग चौथ्या दिवशी नवीन रुग्णांचा आकडा हा 10 हजारांच्या घरात आहे. गेल्या 24 तासांत 10 हजार 974 नवीन रुग्णांची नोंद झाली. तर 2003 रुग्णांचा मृत्यू झाला. यासह आता एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 1 लाख 86 हजार 935 झाला आहे. तर एकूण मृतांचा आकडा 11 हजार 903 झाला आहे. यासह भारताचा मृत्यूदर 2.9% वरून 3.4 झाला आहे.
देशात कोरोनाव्हायरसमुळे (Coronavirus In India) पहिला मृत्यू झाल्यानंतर 100 दिवसांच्या आतच 10 हजारहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात पहिल्या कोरोना रुग्णाचा मृत्यू 12 मार्चला झाला होता.
इतर देशांच्या तुलनेत कोरोनाबाधितांच्या एकूण आकडेवारीनुसार चौथ्या क्रमांकावर आहे. भारताच्या आधी अमेरिका, ब्राझील, रशिया यांच्या क्रमांक लागतो.
2003 deaths and 10,974 new #COVID19 cases in the last 24 hours. The total number of positive cases in the country now stands 3,54,065 at including 1,55,227 active cases, 1,86,935 cured/discharged/migrated and 11903 deaths: Ministry of Health and Family Welfare pic.twitter.com/tZM4EIZCfM
— ANI (@ANI) June 17, 2020
राज्यांची स्थिती
गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात 2701 नवीन रुग्णांची नोंद झाली. यासह महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा हा 1 लाख 13 हजार 445 झाला आहे. तर, 1409 लोकांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रानंतर दिल्लीत सर्वात जास्त कोरोनाबाधितांची नोंद झाली. दिल्लीत 1859 रुग्णांची नोंद झाली. तर 437 जणांचा मृत्यू झाला.
गेल्या आठवड्यात 2500 मृत्यू
देशात पहिल्या 5000 मृत केसेस 80 दिवसांत आल्या, त्यानंतर केवळ 17 दिवसांत 5000 मृत्यू झाले, ज्यामध्ये गेल्या आठवड्यात 2500 हून अधिक लोक मरण पावले. कोरोनामुळे भारत जगातील चौथा सर्वाधिक प्रभावित देश आहे, तर कोरोना संसर्गाच्या बाबतीत भारत आठव्या क्रमांकावर आहे.