लंडन, 23 मे : कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) जगभरात हाहाकार माजला आहे. जगभरात अनेक ठिकाणी COVID-19 वर लस शोधण्याचे काम सुरू आहे. अशावेळी ऑक्सफर्ड विद्यापीठातून एक आनंदाची बातमी समोर येत आहे. याठिकाणी संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांनी अशी माहिती दिली आहे की, व्हॅक्सिन शोधण्याच्या सुरूवातीच्या टप्प्यात यश मिळाले आहे आणि ते मानवी स्तरावरील चाचणीसाठी दुसऱ्या टप्प्यामध्ये जाणार आहेत. आज तकने दिलेल्या बातमीनुसार दुसऱ्या स्तरावरील तपासणीसाठी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीतील संशोधक परिक्षणासाठी 10,000 हून अधिक लोकांची भर्ती करणार आहेत.
कोरोनाची लस शोधण्यासाठीचे पहिले परिक्षण गेल्या महिन्यात सुरू झाले होते. ज्यामध्ये 55 वर्षापेक्षा कमी वय असणाऱ्या 1000 प्रौढ स्वयंसेवकांवर ट्रायल करण्यात आली होती. आता रोग प्रतिकारक्षमतेवर होणारा परिणाम लक्षात घेण्यासाठी 70 वर्षापेक्षा जास्त आणि 5 ते 12 वर्ष वय असणारी मुलं असे एकूण 10,200 लोकांपेक्षा अधिक लोकांना तपासणीसाठी नामांकित करण्यात येणार आहे.
(हे वाचा-विमान प्रवास केल्यानंतर राहावं लागणार 14 दिवस क्वारंटाइन? सरकारने दिलं हे उत्तर)
ChAdOx1 nCoV-19 ही लस माकडांवर केलेल्या छोट्याशा प्रयोगानंतर आशादायक परिणाम दिसून आला आहे. विद्यापीठातील व्हॅक्सिनॉलॉजीच्या प्राध्यापक, ज्या या संशोधनामध्ये काम करत आहेत त्यांनी अशी माहिती दिली की, लसीच्या शोधसाठी त्यांची टीम खूप मेहनत घेत आहे. यामध्ये ChAdOx1 nCoV-19 ची सुरक्षा, इम्युनोजेनेसिटी आणि प्रभावकारकता याचे आकलन केले जात आहे.
त्यांनी अशी माहिती दिली की, 55 वर्षापेक्षा अधिक वय असणाऱ्या व्यक्ती पहिल्या टप्प्यामध्ये सहभागी होण्यासाठी सक्षम नव्हते. आता त्यांना लसीकरणाच्या या दुसऱ्या टप्प्यात सामिल करून घेतले जाणार आहे. देशाच्या विविध भागातील लोकांना यामध्ये सहभागी केले जाणार आहे. या संशोधनाच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये 18 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्तींवर अभ्यास केला जाणार आहे.
(हे वाचा-भयंकर! कोरोनानं एका बॉडी बिल्डरची केली अशी अवस्था, फोटो पाहून तुमचीही झोप उडेल)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona vaccine, Oxford