भयंकर! कोरोनानं एका बॉडी बिल्डरची केली अशी अवस्था, फोटो पाहून तुमचीही झोप उडेल

भयंकर! कोरोनानं एका बॉडी बिल्डरची केली अशी अवस्था, फोटो पाहून तुमचीही झोप उडेल

कोरोनामुळं शरीरावर किती वाईट परिणाम होतो, हे या फोटोवरून तुम्हाला कळेल.

  • Share this:

बॉस्टन, 23 मे : कोरोनानं साऱ्या जगात थैमान घातलं आहे. दररोज कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. मात्र अद्याप कोरोनावर औषध किंवा लस शोधण्यात यश आलेले नाही. त्यामुळं कोरोना बरा करण्यासाठी सध्या केवळ प्रतिकारशक्ती वाढवणं हा एकमेव पर्याय आहे. दरम्यान कोरोनामुळं शरीरावर किती वाईट परिणाम होतात, हे एका फोटोवरून तुम्हाला कळू शकेल. उत्कृष्ठ शरीरयष्ठी असलेल्या एक इसमाला कोरोनानं कमकुवत केले आहे. अमेरिकेच्या एका बॉडी बिल्डर नर्सचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

43 वर्षीय नर्स माईक शल्टझ 2 महिन्यांपासून कोरोना रुग्णांवर उपचार करत होता. मात्र रुग्णांच्या संपर्कात आल्यानंतर माईकलाही कोरोनाची लागण झाली. त्यानंतर त्याला बॉस्टनमधील रुग्णालयात दाखल केले. 6 आठवडे माईवर उपचार सुरू होते, या दरम्यान त्याला व्हेंटिलेटरवरही ठेवण्यात आलं होतं. मात्र माईक आपल्याला काय झाले हे सुद्धा कळत नव्हतं, त्याचं शरीर कमकुवत झालं होतं. उपचारादरम्यान पहिल्या 6 आठवड्यातच माइक आपली शरीरयष्ठी गमावून बसला होता. त्याचे शरीर एवढं कमकुवत झालं होतं की हाडंही दिसू लागली होती. माईक आपला फोनही उचलू शकत नव्हता.

कोरोनामुळं माईकला अशक्तपणा आला होता, त्यामुळं फोनवर टाइप करताना त्याची बोट कापत असत. रुग्णालयात दाखल होण्याआधी माईकचे वजन 87 किलोग्राम होते, मात्र कोरोनामुळं तब्बल 24 किलो वजन कमी झाले. माईकला अपेक्षा नव्हती की तो कोरोनावर मात करेल, पण त्यानं करून दाखवलं. माईकनं सांगितले की, तो दर आठवड्याला 7 ते 8 बार व्यायाम करायचा, त्यामुळं त्याला विश्वास होता की कोरोना कधीच होणार नाही. मात्र त्याचा हा विश्वास फोल ठरला.

मार्चच्या सुरुवातीला माईक मियामी येथे एका पार्टीला गेला होता. या पार्टीवरून आल्यानंतर माईक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं आढळून आलं. कारण या पार्टीत सामिल झालेल्या 38 लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली, तर 3 जणांचा मृत्यू झाला. माईकला त्याच्या बॉयफ्रेण्डनं रुग्णालयात दाखल केलं. गेले 8 आठवडे माईक रुग्णालयात असून, आता त्याची प्रकृती ठिक आहे.

 

View this post on Instagram

 

Just a quiet Saturday night at home. #gaymusclebear #beard #musclebeard

A post shared by Mike (@thebearded_nurse) on

माईक सोशल मीडियावर सुंदर नर्स म्हणून ओळख ला जातो. 30 हजारच्या वर त्याचे फॉलोअर्स आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 23, 2020 07:39 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading