मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /तालिबानचा क्रिकेटला फटका : अफगाणिस्तानची वन-डे सीरिज स्थगित

तालिबानचा क्रिकेटला फटका : अफगाणिस्तानची वन-डे सीरिज स्थगित

अफगाणिस्तानवर (Afghanistan) तालिबानची राजवट येताच देशातील परिस्थिती बदलली आहे. नागरिकांचे सर्वसामान्य आयुष्य खराब झाल्यानंतर तालिबानमुळे आता क्रिकेटही प्रभावित झालं आहे.

अफगाणिस्तानवर (Afghanistan) तालिबानची राजवट येताच देशातील परिस्थिती बदलली आहे. नागरिकांचे सर्वसामान्य आयुष्य खराब झाल्यानंतर तालिबानमुळे आता क्रिकेटही प्रभावित झालं आहे.

अफगाणिस्तानवर (Afghanistan) तालिबानची राजवट येताच देशातील परिस्थिती बदलली आहे. नागरिकांचे सर्वसामान्य आयुष्य खराब झाल्यानंतर तालिबानमुळे आता क्रिकेटही प्रभावित झालं आहे.

मुंबई, 24 ऑगस्ट: अफगाणिस्तानवर (Afghanistan) तालिबानची राजवट येताच देशातील परिस्थिती बदलली आहे. नागरिकांचे सर्वसामान्य आयुष्य खराब झाल्यानंतर तालिबानमुळे आता क्रिकेटही प्रभावित झालं आहे. वास्तविक नव्या राजवटीचा क्रिकेटवर काही परिणाम होणार नाही, असं आश्वासन तालिबाननं अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाला (Afghanistan Cricket Board) दिले होते. या आश्वासनानंतर आठवडाभराच्या आताच परिस्थिती बदलली आहे.

तालिबान राजवटीचा पहिला फटका अफगाणिस्तान विरुद्ध पाकिस्तान (Afghanistan vs Pakistan) यांच्यात होणाऱ्या वन-डे सीरिजला बसला आहे. दोन्ही देशांमधील 3 वन-डे मॅचची सीरिज 3 सप्टेंबरपासून श्रीलंकेच सुरू होणार होती. काबूलम विमानतळावरुन व्यावसायिक विमानांच्या उड्डाणांना बंदी असल्यानं ही मालिका स्थगित झाली आहे.

'स्पार्ट्सस्टार' नं याबाबत दिलेल्या वृत्तानुसार अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे सीईओ हमिद शिनवारी यांनी ही माहिती दिली आहे. 'आम्ही खेळाडूंचे आरोग्य आणि मानसिक अवस्था लक्षात घेता ही सीरिज स्थगित करण्याचा निर्णय परस्पर सहमतीनं घेतला आहे. ही सीरिज पाकिस्तानमध्ये होणार असल्याचं काही मीडिया रिपोर्टमध्ये स्पष्ट करण्यात आलं होतं, पण सध्याच्या परिस्थितीमध्ये हे शक्य नाही.'

पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) आणि श्रीलंका बोर्डानं (SLC) या सीरिजच्या यजमानपदाबाबत आमची खूप मदत केली, पण सध्याच्या परिस्थितीमध्ये हे शक्य नाही. ही स्पर्धा 2023 साली होणाऱ्या क्रिकेट वर्ल्ड कपचा भाग आहे. पण आम्ही आयसीसीला याची कल्पना दिली असून वर्ल्ड कपपूर्वी नव्या तारखा देण्याची मागणी केली आहे.' असे शिनवारी यांनी सांगितले.

तालिबानमुळे अफगाणिस्तानच्या क्रिकेटपटूशी होणारं लग्न मोडणार, 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीला भीती

तालिबाननं दिलं होतं आश्वासन

यापूर्वी,  रविवारी तालिबानचे प्रतिनिधी, अफगाणिस्तान क्रिकेट टीमचे सदस्य आणि बोर्डच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बैठक झाली. यानंतर अजीजुल्लाह फाजली (Azizullah Fazli) यांना अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचं (Afghanistan Cricket Board) कार्यवाहक अध्यक्ष करण्यात आलं आहे.

आम्ही क्रिकेटला पाठिंबा देऊ, असं आश्वासन तालिबानने या बैठकीत पुन्हा दिलं. जेव्हा आम्ही मागच्यावेळी देशाची सत्ता मिळवली होती, तेव्हा देशात क्रिकेट खेळायला सुरुवात झाली होती, त्यामुळे यावेळीही क्रिकेटला समर्थन दिलं जाईल, असं तालिबानने सांगितलं होतं.

First published:
top videos

    Tags: Afghanistan, Cricket news, Taliban