Home /News /videsh /

Russia- Ukraine War: युक्रेनला मदतीची गरज, ऐनवेळी अमेरिकेनं फिरवली पाठ

Russia- Ukraine War: युक्रेनला मदतीची गरज, ऐनवेळी अमेरिकेनं फिरवली पाठ

russia ukraine war

russia ukraine war

युक्रेनमध्ये (Ukraine) रशिया (Russia) केमिकल हल्ला (chemical attack) करण्याच्या शक्यता आहे. असा अमेरिकेनं इशारा दिला आहे. अशातच अमेरिकेने पाठ फिरवली आहे. युक्रेनला (Ukraine War) मिग-29 फायटर (MiG-29 Fighter Jets) जेट देण्यास नकार दिला आहे.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 10 मार्च: युक्रेनमध्ये (Ukraine) रशिया (Russia) केमिकल हल्ला (chemical attack) करण्याच्या शक्यता आहे. असा अमेरिकेनं इशारा दिला आहे. अशातच अमेरिकेने पाठ फिरवली आहे. युक्रेनला (Ukraine War) मिग-29 फायटर (MiG-29 Fighter Jets) जेट देण्यास नकार दिला आहे. युक्रेनला मोठा धक्का देत अमेरिकेने पोलंडची 28 मिग-29 लढाऊ विमाने पुरवण्याची ऑफर नाकारली आहे. पोलंडचे मिग-29 हे लढाऊ विमान जर्मनीतील अमेरिकन हवाई दलाच्या तळावर हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाने फेटाळला. युक्रेन आणि रशिया यांच्यात भयंकर युद्ध सुरू असताना अमेरिकेने ही अत्यंत महत्त्वाची ऑफर नाकारली आहे. रशियन सैन्याने राजधानी कीवला वेढा घातला असून ते राजधानीपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर आहे. रशियाशी सामना करण्यासाठी युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की हे सातत्याने पाश्चात्य देशांना लढाऊ विमाने उपलब्ध करून देण्याची विनंती करत आहेत. जगभरात खळबळ माजवणारी बातमी, युक्रेनवर केमिकल Attack होणार?; अमेरिकेचा इशारा पेंटागॉनचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी बुधवारी माध्यमांना संबोधित करताना सांगितले की पोलंड ही ऑफर स्वीकारण्यास असमर्थ आहे. पोलंडने ही लढाऊ विमाने अमेरिकेतील रामस्टीन एअरबेसवर हस्तांतरित करावीत, असा प्रस्ताव दिला होता. यानंतर, तेथून त्याला रशियाविरुद्ध युक्रेनला मदत करण्यासाठी पाठवावे. किर्बी म्हणाले की, जर ही विमाने जर्मनीहून युक्रेनला संघर्षमय भागातून पाठवली गेली तर ती संपूर्ण नाटो आघाडीसाठी गंभीर चिंतेची बाब बनेल. रशियन लढाऊ विमाने सध्या युक्रेनच्या आकाशात गस्त घालत आहेत आणि बॉम्बफेक करत आहेत. याबाबत आम्ही पोलंड आणि इतर नाटो देशांशी सल्लामसलत करत राहू, असे अमेरिकेच्या प्रवक्त्याने सांगितले. पोलंडचा प्रस्ताव अशा वेळी आला जेव्हा युक्रेनचे अध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांनी शनिवारी ही विमाने अमेरिकेला त्यांच्याकडे सोपवण्याची विनंती केली. यानंतर पोलंडने असे विधान केले की ते इतर नाटो देशांनाही त्यांची लढाऊ विमाने युक्रेनकडे सोपवतील, ज्यांना हवाई दलाने उड्डाण करण्याचे प्रशिक्षण दिले आहे. रशिया युक्रेन युद्धाचा भारतातल्या शेतकऱ्यांना होणार फायदा?, कसा काय ते जाणून घ्या  अमेरिकेच्या परराष्ट्र व्यवहारातील आणखी एक अधिकारी व्हिक्टोरिया नूलँड यांनी सांगितले की, पोलंडने ही ऑफर देण्यापूर्वी अमेरिकेशी सल्लामसलत केली नव्हती. पोलंडच्या या निर्णयामुळे अमेरिकन सरकारला धक्का बसला आहे. अमेरिकन गुप्तचर विभाग आणि संरक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी ही विमाने हस्तांतरित करण्यास विरोध केला. मिग-29 च्या जागी अमेरिकेने त्यांना एफ-16 लढाऊ विमाने द्यावीत, असे पोलंडने म्हटले आहे.
    Published by:Dhanshri Otari
    First published:

    Tags: America, Russia, Russia Ukraine, Russia's Putin, Ukraine news

    पुढील बातम्या