नवी दिल्ली, 9 मार्च: रशिया (Russia) आणि युक्रेनमध्ये (Ukraine) युद्ध सुरू आहे. आज या युद्धाचा चौदावा दिवस आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामध्ये आतापर्यंत अनेक युक्रेननियन नागरिकांना आपला जीव गमवावा (Russian attack on Ukraine) लागला आहे. तसेच मोठ्याप्रमाणात वित्त हानी देखील झाली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात बेरोजगारी निर्माण होण्याची भीती वक्त करण्यात येत आहे. अशातच रशिया युक्रेन युद्धाचा फायदा पंजाबला (Punjab) होणार असल्याची चर्चा रंगली आहे. रशिया आणि युक्रेन जगातील 40 टक्के गव्हाचा पुरवठा करतात. अशा परिस्थितीत युद्ध लांबले तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारताच्या गव्हाची मागणी वाढेल, त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य भाव मिळेल, असे पंजाबच्या शेतकऱ्यांना वाटते. 2019 च्या आकडेवारीनुसार, रशिया हा जगातील सर्वात मोठा गहू निर्यात करणारा देश होता. त्याच वेळी, युक्रेन या प्रकरणात पाचव्या क्रमांकावर होता. म्हणजेच हे दोन देश जगातील 40 टक्के गव्हाची निर्यात करतात. हे युद्ध दीर्घकाळ राहिल्यास दोन्ही देशांतील गव्हाच्या निर्यातीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. या स्थितीत भारत गव्हाचा मोठा निर्यातदार होऊ शकतो. पंजाबमधील खन्ना शहर (Punjab Khanna city) हे आशियातील सर्वात मोठे धान्य बाजार आहे. मात्र गेल्या काही काळापासून ते ओसाड पडले आहे. फार कमी खरेदीदार येथे पोहोचतात. पंजाबमध्ये उत्तम दर्जाचा गहू पिकवला जातो पण त्याची निर्यात फक्त श्रीलंका आणि बांगलादेशपर्यंतच मर्यादित आहे. भारतातही मोठ्या कंपन्या रशिया आणि युक्रेनच्या गव्हावर लक्ष ठेवतात. मात्र रशिया-युक्रेन युद्धानंतर भारताच्या गव्हाची मागणी वाढू शकते. खन्ना शहरातील गहू व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष हरबंश सिंग रोशा यांनी न्यूज 18 डॉट कॉम ला दिलेल्या माहितीनुसार, आम्ही खूप अडचणीत आहोत. कांडला बंदरात जाणारा बहुतांश गहू सहारनपूर आणि मध्य प्रदेशातून येतो. पंजाबमध्ये चांगल्या प्रतीचा गहू असूनही त्याला खरेदीदार नाही. एमएसपी खूप कमी आहे. आमच्याकडे अजूनही 40 लाख टन गव्हाचा साठा आहे. काढणीनंतर ते 200 लाख टन होईल. पण या युद्धाशी आपल्या काही आशा आहेत. सूत्रांनी सांगितले की, बडे खरेदीदार अदानी आणि आयटीसीने व्यापाऱ्यांशी बोलणे सुरू केले आहे. शेतकऱ्यांची राजकीय संघटना असलेल्या संयुक्त समाज मोर्चाचे अध्यक्ष बलबीर सिंग राजेवाल यांनीदेखील यावर भाष्य केले. होय, हे खरे आहे की हे युद्ध व्यापाऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते परंतु शेतकऱ्यांसाठी नाही. एमएसपीचा चांगला दर शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा आहे. आम्हाला आशा आहे की पंजाबच्या नवीन सरकारला हे समजेल. कारण युद्ध लांबणार असून एप्रिलमध्ये पीक काढणी होणार आहे. त्यामुळे नफ्याकडे लक्ष दिले पाहिजे. असे सिंग यावेळी म्हणाले. पंजाबमध्ये हरबंश सिंग रोशासारखे अनेक शेतकरी आहेत जे पंजाबमध्ये नवीन सरकार स्थापनेची वाट पाहत आहेत. पंजाबमध्ये गव्हाचे भाव जास्त असल्याचे रोशा सांगतात. गुजरात, मध्य प्रदेश आणि यूपीमध्ये गव्हावरील कर कमी आहे, त्यामुळे तेथे गहू स्वस्त असल्याचे त्यांनी सांगितले. आमच्या इथे जास्त कर आहे. सरकार स्थापन झाल्यावर आम्ही त्यांच्याकडे कर कमी करण्याची मागणी करू. अशी प्रतिक्रिया रोशा यांनी यावेळी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.