प्योंगयांग, 09 जुलै: Kim Jong Un Weight Loss उत्तर कोरियाचे हुकुमशाह किम जों उन (North Korean Leader Kim Jong Un) यांनी जवळपास 10 ते 20 किलोने त्यांचं वजन कमी केलं आहे. किम जोंग उन यांचं अचानक कमी झालेलं हे वजन सध्या चर्चेचा विषय बनला आहे. दरम्यान त्यांचा एक लेटेस्ट व्हिडीओ देखील समोर, त्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्या आरोग्यासंदर्भात चिंता व्यक्त केली जात आहे.
कोरियातील नेतेमंडळी देखील किम यांच्या घटणाऱ्या वजनामुळे चिंतेंत आहेत. दक्षिण कोरियातील एका खासदाराने असे म्हटले आहे की नॅशनल इंटेलिजन्स सर्व्हिसने असा अंदाज व्यक्त केला आहे किम यांनी 10 ते 20 किलो (44 Pounds) दरम्यान वजन कमी केलं आहे. याबाबत माहिती देताना अत्यंत नियंत्रित असणाऱ्या सरकारी माध्यमांनी असे म्हटले आहे की देशातील लोक या विषयावर अत्यंत चिंता व्यक्त करत आहेत.
हे वाचा-आशिया खंडात हे आहेत टॉप-7 कोरोनाबाधित देश, लसीकरणात भारताखालोखाल या देशांचा नंबर
काही दिवसांपूर्वी किम यांचा एक फोटो देखील सोशल मीडियाद्वारे समोर आला होता. किम यांनी आपलं वजन मोठ्या प्रमाणात कमी केल्याचे उत्तर कोरिया सरकारने प्रसिद्ध केलेल्या या छायाचित्रावरून दिसून आलं होतं. त्यांच्या फॅन्सी घड्याळ्याचा पट्टा अधिक घट्ट झाल्याचं आणि त्यांच्या चेहऱ्यावरून ते बारीक झाल्याचं या फोटोत दिसतं आहे. काही निरीक्षकांच्या मते, किम यांची उंची 170 सेंटिमीटर म्हणजे 5 फूट 8 इंच आहे. यापूर्वी त्याच वजन 140 किलोग्रॅम म्हणजेच 308 पौंड होतं. आता त्यानी 10 ते 20 किलोग्रॅम म्हणजे 22 ते 44 पौंड वजन कमी केलं आहे.
हे वाचा-पेट्रोल पंपावर लाखो किड्यांचा कब्जा; वडिलांसोबत आलेल्या मुलावर भयंकर हल्ला
दक्षिण कोरिया, अमेरिका आणि जपान यांसारख्या देशांमध्ये किम यांचं आरोग्य चिंतेचा विषय बनलं आहे. त्यांचं वजन पुन्हा वाढलं आहे का? श्वास घ्यायला त्रास होतोय का? त्यांच्याकडे काठी का आहे? ते आवश्यक कार्यक्रमात सहभागी का होत नाहीत? असे अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. जवळपास एक महिनाभर किम सार्वजनिक कार्यक्रमात दिसून आले नव्हते. त्यानंतर जेव्हा ते पहिल्यांदा दिसले तेव्हा सियोल आधारित वेबसाइट एनके न्यूजच्या विश्लेषकांनी असं म्हटलं होतं की किम यांचं वजन कमी झालं आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सने देखील त्यांचं वजन कमी झाल्याने लोकांनी चिंता व्यक्त केल्याचं म्हटलं होतं. रॉयटर्सने 28 जून रोजी शेअर केलेला हा व्हिडीओ पुन्हा एकदा व्हायरल होत आहे.
Before-and-after videos show that North Korean leader Kim Jong Un noticeably lost weight. On Sunday, the country's state media offered a rare public segment on it, although the reason for the weight loss is unclear https://t.co/RhQEqL7dXH pic.twitter.com/H9szU1rA1W
— Reuters (@Reuters) June 27, 2021
अधिक प्रमाणात मद्य घेणारी (Drink) आणि स्मोकिंग (Smoking) करणारी व्यक्ती अशी किमची ओळख आहे. तसंच त्यांना हृदयविकाराची फॅमिली हिस्ट्री आहे. त्याच्यापूर्वी उत्तर कोरियावर राज्य करणारे त्याचे वडील आणि आजोबा यांचा मृत्यू हा हृदयविकाराने झालेला आहे. किमचे वजन अतिरिक्त वाढल्याने त्याला हृदयविकार (Heart Disease) जडण्याची शक्यता आहे, असं काही तज्ज्ञांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: International, Kim jong un