मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

आशिया खंडात हे आहेत टॉप-7 कोरोनाबाधित देश, लसीकरणात भारताखालोखाल या देशांचा नंबर

आशिया खंडात हे आहेत टॉप-7 कोरोनाबाधित देश, लसीकरणात भारताखालोखाल या देशांचा नंबर

 भारतात दुसरी लाट ओसरली आहे, तर पाकिस्तानात चौथ्या लाटेचा इशारा मिळायला सुरुवात झाली आहे. तर इराणमध्ये पाचवी लाट सध्या कहर करते आहे. काही देशांत कोरोनाची लाट ओसरायलाही सुरुवात झाली आहे.

  • Published by:  desk news

नवी दिल्ली, 8 जुलै: भारतात (India) कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा (Second wave of corona virus) जोर ओसरत असला तरी आशिया खंडातील (Asia) इतर देश मात्र अजूनही कोरोनाचा सामना करत आहेत. भारतात दुसरी लाट ओसरली आहे, तर पाकिस्तानात (Pakistan) चौथ्या लाटेचा इशारा मिळायला सुरुवात झाली आहे. तर इराणमध्ये (Iran) पाचवी लाट सध्या कहर करते आहे. काही देशांत कोरोनाची लाट ओसरायलाही सुरुवात झाली आहे. अर्थात, आशिया खंडात कोरोनाचा सर्वाधिक फटका हा भारताला बसला असून भारताखालोखाल इतर देशांमध्येही कोरोनानं धुमाकूळ घातला आहे.

दुसरा नंबर कुणाचा?

भारतात आतापर्यंत 3 कोटी 5 लाखांपेक्षा अधिक नागरिकांना कोरोना झाला आहे, तर 4 लाखांपेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या 4 लाख 95 हजार ऍक्टिव केसेस असून देशाचा रिकव्हरी दर 96.97 टक्के झाला आहे. कोरोनाच्या उद्रेकाबाबत भारताखालोखाल दुसरा नंबर टर्कीचा. टर्कीत आतापर्यंत 54 लाख 30 हजार नागरिकांना कोरोनाची बाधा झाली असून 49 हजार 829 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 80 हजार 186 जण सध्या कोरोनाबाधित असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कोरोना रुग्णसंख्येच्या बाबतीत भारत आणि टर्कीखालोखाल इराण(32.32 लाख), इराक(13.59 लाख), फिलिपिन्स14.24 लाख), इंडोनेशिया (14.24 लाख) आणि पाकिस्तान (9.61 लाख) अशी रुग्णसंख्या नोंदवण्यात आली आहे.

लसीकरणाबाबत कोण अग्रेसर

लसीकरणाबाबत भारतानं सर्व आशियायी देशांना मोठ्या फरकानं मागे टाकत आतापर्यंत 35 कोटी लसीकरणाचा टप्पा पार केला आहे. भारताखालोखाल टर्की ( 5.12 कोटी), इंडोनेशिया (4.41 कोटी), फिलिपाईन्स (1.07 कोटी), पाकिस्तान (1.63 कोटी), इराण (57.20 लाख) आणि इराक (8.05 लाख) यांचा नंबर लागत असल्याचं चित्र आहे.

हे वाचा - कोरोनानंतर आता आणखी एक व्हायरस; Cytomegalovirus चे 6 रुग्ण सापडल्याने खळबळ

डेल्टा व्हायरसचा धोका

दुसरी लाट ओसरत असली तरी या सर्वच देशांत सध्या डेल्टा व्हायरसची भीती व्यक्त होत असून भारताप्रमाणेच इतर सर्व देशांच्या लसीकरणाचा वेग मंदावल्याचं चित्र गेल्या काही आठवड्यांपासून दिसू लागलं आहे. यातील बहुतांश देशांनी आंतरराष्ट्रीय प्रवासावरील बंधनं कायम ठेवली असून लसीकरण वाढवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

First published:

Tags: Corona, Corona vaccination, Coronavirus, Covid-19