मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

जे करायचे ते करा, मिसाईल टेस्ट सुरूच राहतील! किम जोंगचे अमेरिकेला खुले आव्हान

जे करायचे ते करा, मिसाईल टेस्ट सुरूच राहतील! किम जोंगचे अमेरिकेला खुले आव्हान

अमेरिकेनं कितीही दबाव आणला तरी आपला अण्वस्त्र कार्यक्रम सुरूच राहिल, अशी जाहीर घोषणा उत्तर कोरियाच्या किम जोंग उनने केली आहे.

अमेरिकेनं कितीही दबाव आणला तरी आपला अण्वस्त्र कार्यक्रम सुरूच राहिल, अशी जाहीर घोषणा उत्तर कोरियाच्या किम जोंग उनने केली आहे.

अमेरिकेनं कितीही दबाव आणला तरी आपला अण्वस्त्र कार्यक्रम सुरूच राहिल, अशी जाहीर घोषणा उत्तर कोरियाच्या किम जोंग उनने केली आहे.

  • Published by:  desk news

सिऊल, 20 जानेवारी: अमेरिकेने (America) कितीही दबाव (Pressure) आणण्याचा प्रयत्न केला तरी आपण अण्वस्त्र चाचण्या (Nuclear Tests) करण्याचा सिलसिला सुरूच ठेवणार असल्याची घोषणा उत्तर कोरियाचा (North Korea) हुकूमशहा किम जोंग उन (Kim Jong Un) याने केली आहे. एकाच महिन्यात सलग 4 अण्वस्त्र चाचण्या केल्यामुळे वादग्रस्त ठरलेल्या उत्तर कोरियावर अमेरिकेनं निर्बंध लादण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या निर्बंधांना बिलकूल न जुमानता आपला अण्वस्त्र सज्जतेचा कायम आपण ठरल्याप्रमाणे सुरूच ठेवणार आहोत, असं किम जोंग उन यांनी म्हटलं आहे. 

काय आहे भूमिका?

उत्तर कोरियातील सत्ताधारी वर्कर्स पार्टीच्या पॉलिट ब्युरोची बैठक नुकतीच पार पडली. किम जोंग यांनी या बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवलं होतं. अमेरिेकची भूमिका दुटप्पी असल्याची टीका या बैठकीत किम जोंग यांनी केली. आतापर्यंत अण्वस्त्र सज्जतेच्या बाबतीत ज्या प्रक्रिया थांबवण्यात आल्या होत्या, त्यादेखील यापुढे सुरू केल्या जातील, अशी घोषणाही त्यांनी केली आहे 

दुष्काळावरून लक्ष विचलित

कोरोना काळापासून उत्तर कोरियाने सीमा बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे धान्याची आयात होऊ शकलेली नाही. त्यामुळे उत्तर कोरियात मोठा दुष्काळ पडला आहे. महागाईने कळस गाठला असून सर्वसामान्य माणसांचं जगणं कठीण झालं आहे. अशा परिस्थितीत अमेरिका आणि शेजारी देशांना आव्हान देत राष्ट्रवादाचं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न किम जोंग करत असल्याची टीका राजकीय विश्लेषक करत आहेत. सततच्या आणि लागोपाठ मिसाईल चाचण्यांमुळे जपान आणि दक्षिण कोरिया या शेजारी देशांचीदेखील चिंता वाढली आहे. देशातील जनतेला अन्न पुरवू न शकणारं सरकार आता राष्ट्रवादाच्या विचारात गुंतवू पाहत असल्याचं सांगितलं जात आहे. 

हे वाचा -

काय आहे प्रकरण?

उत्तर कोरियानं जानेवारी महिन्यात आतापर्यंत 4 मिसाईल टेस्ट केल्या आहेत. त्यातील एक सुपरसॉनिक मिसाईल होतं तर इतर बॅलेस्टिक मिसाईल असल्याचं सांगितलं जात आहे. पहिल्या अण्वस्त्र चाचणीनंतर अमेरिेकनं निर्बंध घालूनही त्याला न जुमानता उत्तर कोरियानं आपली चाचण्यांची मालिका सुरूच ठेवली आहे.

First published:

Tags: America, Ballistic missiles, North korea