मुंबई, 20 जानेवारी : टेनिस विश्वातील नंबर 1 खेळाडू नोवाक जोकोविच (Novak Djokovic) सध्या चांगलाच चर्चेत आहे. कोरोना लस (Covid Vaccine) न घेण्याची भूमिका त्याने यापूर्वी अनेकदा मांडली आहे. या कारणामुळे ऑस्ट्रेलियन सरकारने त्याचा व्हिसा रद्द करत त्याला परत पाठवले. 9 वेळा ऑस्ट्रेलियन ओपन जिंकणारा जोकोविचला यंदा ही स्पर्धा न खेळताच मेलबर्न सोडावे लागले. या सर्व प्रकरणातून धडा घेत जोकोविचने मोठा निर्णय घेतला आहे.
जोकोविचने डेन्मार्कमधील बोयो-टेक कंपनीतील 80 टक्के शेअर्स खरेदी केले आहेत. ही कंपनी लस न घेता कोरोनावर उपचार करण्यावर संशोधन करत आहे. रॉयटरनं दिलेल्या वृत्तानुसार डेन्मार्कमधील कंपनी क्वांटबायोरेसमध्ये (QuantBioRes) जोकोविचने 80 टक्के भागिदारी आहे. या कंपनीचे सीईओ इवान लोन्कारविच (Ivan Loncarevic) यांच्या हवाल्यानं हे वृत्त देण्यात आले आहे. जोकोविचने जून 2020 मध्येच या कंपनीत गुंतवणूक केल्याची माहिती आहे. याबाबत त्याच्या प्रवक्त्याने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
या कंपनीचे 11 संशोधक डेन्मार्क, ऑस्ट्रेलिया आणि स्लोवेनिया या देशातील फर्ममध्ये या विषयावर संशोधन करत आहेत. या वर्षाच्या शेवटी ब्रिटनमध्ये क्लीनिकल ट्रायल करण्यास कंपनीला परवानगी मिळेल, अशी आशा लोन्कारविच यांनी व्यक्त केली आहे.
पुढच्या आठवड्यापासून 'या' देशात मास्क घालण्याची गरज नाही
जोकोविचनं मेडिकल कारण देत व्हिसा नियमांमध्ये सूट देण्याची मागणी ऑस्ट्रेलियन सरकारकडे केली होती. आपली मागणी मान्य झाल्याचा दावा करत जोकोविच या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मेलबर्नमध्ये दाखल झाला होता. त्यावेळी त्याला विमानतळावरच अडवण्यात आले. त्यानंतर त्याची रवानगी इमिग्रेशन सेंटरमध्ये करण्यात आली. त्यानंतर या प्रकरणात जोकोविचने न्यायालयीन लढा दिला, पण त्यामध्ये त्याला अपयश आले. ऑस्ट्रेलियन सरकार तसेत फेडरल कोर्टाने त्याची याचिका फेटाळली. त्यामुळे त्याला ऑस्ट्रेलिया सोडावे लागले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.