सिउल, 11 जानेवारी: आपल्या अनिर्बंध कारभारासाठी ओळखल्या जाणाऱ्या उत्तर कोरियाने (North Korea) एकाच आठवड्यात सलग दुसरी (Second in a week) क्षेपणास्त्र चाचणी (Ballestic Missile Test) केली आहे. या चाचणीला शेजारी राष्ट्रांनी (Neighbours) तीव्र आक्षेप घेतला असून अमेरिका (USA) आणि युनायटेड नेशन्स (UN) याबाबत कडक पावलं उचलण्याची मागणी केली आहे. दक्षिण कोरिया आणि जपान या दोन्ही देशांच्या यंत्रणांनी या चाचणीची दृश्यं टिपली असून त्यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. सलग दुसरी चाचणी उत्तर कोरियाने हुुकूमशहा किम जोंग उन याच्या आदेशानुसार 5 जानेवारी रोजी पहिली क्षेपणास्त्र चाचणी केली होती. एक बॅलिस्टिक मिसाईल फायर करून त्याची चाचणी यशस्वी झाल्याचा दावा उत्तर कोरियाने केला होता. या घटनेचा अमेरिका, जपान आणि इतर सुरक्षा काउन्सिलनी निषेध केला होता. त्यानंतर सोमवारी उत्तर कोरियाकडून दुसरं मिसाईल फायर करण्यात आलं आणि ते समुद्रात जाऊन पाडण्यात आलं. 5 जानेवारी रोजी घेतलेल्या चाचणीपेक्षा सोमवारी घेण्यात आलेली चाचणी ही अधिक शक्तीशाली मिसाईलची होती, असं निरीक्षण दक्षिण कोरियाच्या सैन्यदलानं नोंदवलं आहे. हे मिसाईल जपान आणि दक्षिण कोरिया यांच्या समुद्री सीमेच्या अगदी जवळ जाऊन पडल्यामुळे दोन्ही देशांची चिंता वाढली आहे. जपान आणि दक्षिण कोरियाकडून निषेध उत्तर कोरियाकडून स्थानिक वेळेनुसार सकाळी 7.27 मिनिटांनी हे क्षेपणास्त्र समुद्राच्या दिशेनं घोंगावत गेलं आणि समुद्रात पडलं. जमिनीपासून हे क्षेपणास्त्र साधारण 60 किलोमीटर उंच उडालं आणि सुमारे 700 किलोमीटरचा पल्ला पार करून समुद्रात बुडाल्याची माहिती दक्षिण कोरियाच्या सैन्य विभागानं दिली आहे. अमेरिकेसोबत आम्हीही उत्तर कोरियाच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेऊन असल्याचं दक्षिण कोरियानं म्हटलं आहे. हे वाचा -
उत्तर कोरियाचा दावा आम्ही आमच्या क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी घेतली असून 700 किलोमीटर दूर असलेल्या टार्गेटचाही अचूक वेध घेण्याची क्षमता आपल्या क्षेपणास्त्रात असल्याचं सिद्ध झालं आहे, अशी प्रतिक्रिया उत्तर कोरियाने दिली आहे. त्यांचा हा दावा दक्षिण कोरियाने खोडून काढला असला तरी क्षेपणास्त्रांची सतत होणारी चाचणी हा शेजारी देशांसाठी चिंतेचा विषय असल्याचं म्हटलं आहे. जपानच्या पंतप्रधानांनीही याबाबत चिंता व्यक्त केली आहे.