मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

किम जोंग उन यांनी असं काय केलं होतं ज्यामुळे शेजारच्या देशातल्या Coronavirus पासून वाचला देश?

किम जोंग उन यांनी असं काय केलं होतं ज्यामुळे शेजारच्या देशातल्या Coronavirus पासून वाचला देश?

किम अल सून हिनं सांगितल्याप्रमाणे, नॉर्थ कोरियाचे शासक मानवी मृतदेहांचा वापर शेतात खतांसाठी करत आहेत. या सरकारनं राजधानी प्योंगप्योंगच्या जवळ एक शेत तयार केलं आहे.

किम अल सून हिनं सांगितल्याप्रमाणे, नॉर्थ कोरियाचे शासक मानवी मृतदेहांचा वापर शेतात खतांसाठी करत आहेत. या सरकारनं राजधानी प्योंगप्योंगच्या जवळ एक शेत तयार केलं आहे.

उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन यांच्या स्वतःच्याच प्रकृतीविषयी उलट सुलट बातम्या येत असताना ही चर्चाही आता जगभरात होत आहे.

  • Published by:  अरुंधती रानडे जोशी

नवी दिल्ली, 21 एप्रिल : चीनमध्ये (China) Coirovirus थैमान घालत असताना शेजारी देश असलेला उत्तर कोरिया (North Korea) कसा या विषाणूच्या संसर्गातून वाचला? उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन यांच्या स्वतःच्याच प्रकृतीविषयी उलट सुलट बातम्या येत असताना ही चर्चाही आता जगभरात होत आहे. उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेते किम जोंग उन (Kim Jong Un) यांची प्रकृती नाजूक असल्याची बातमी अमेरिकन गुप्तचर यंत्रणांनी दिली होती. मात्र दक्षिण कोरियातील सरकारी सूत्रांनी ही बातमी खोटी असल्याचे सांगितले आहे.

चीनच्या शेजारी असूनही उत्तर कोरियात कोरोनाचा एकही रुग्ण मार्चपर्यंत सापडला नाही. मार्चच्या शेवटी या देशात कोरोनाचे रुग्ण सापडले असल्याचं इथल्या माध्यमांनी मान्य केलं. उत्तर कोरिया सरकारच्या नियंत्रणाखाली असलेली मीडिया म्हणते की, कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने अशी कठोर पावले उचलली. त्याच वेळी  किम जोंग (kim jong un) हे मास्क न लावता सार्वजनिक ठिकाणी फिरताना दिसत होते.

वाचा - किम जोंग यांच्या प्रकृतीबाबत दक्षिण कोरियामधून आली सर्वात मोठी बातमी

किम जोंग-उन यांनी कोरोनाचा प्रसार होण्यासाठी जानेवारीमध्येच देशाची सीमा बंद केली होती, शिवाय व्यापार आणि पर्यटनावर आधीच नियंत्रण आणले होते. उत्तर कोरियाचे अधिकृत प्रेस नियमितपणे कोरोनाचा सामना करण्यासाठी सर्व प्रकारच्या सावधगिरीविषयी लोकांना माहिती देत ​​असते. उदाहरणार्थ, मास्क घालणे, दरवाजाच्या हँडलचे निर्जंतुकीकरण करणे आदी. त्याचबरोबर सर्व सार्वजनिक वाहनांनाही व्हायरसमुक्त करण्यासाठी निर्जंतुकीकरणावर भर दिला जात आहे. सीमेवर तपासणी करण्याव्यतिरिक्त उत्तर कोरियाचे कस्टम अधिकारी परदेशातून आलेले कंटेनर 10 दिवसांसाठी वेगळ्या ठिकाणी ठेवत आहेत.

चीनच्या शेजारील देशात कोरोनाचा एकही रुग्ण नसल्याचं समोर आलं आहे, यावर विश्‍वास ठेवणं जगाला कठीण जात आहे. आर्थिक निर्बंध आणि कमकुवत वैद्यकीय व्यवस्थेमुळे उत्तर कोरियाची 40 टक्के जनता कुपोषित आहे आणि या रोगाला ते  सहजपणे बळी पडू शकतात. अशा परिस्थितीमुळे, उत्तर कोरियामध्ये कोरोना विषाणूच्या साथीमुळे गंभीर संकट उद्भवू शकते आणि बरेच लोकांचा जीव जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

परदेशी नागरिकांना अमेरिकेत NO ENTRY, डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय

First published:

Tags: Coronavirus