मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

Mumbai Local Train: रविवार असतानाही पहिल्याच दिवशी मुंबई लोकलच्या 2 लाख तिकिटांची विक्री

Mumbai Local Train: रविवार असतानाही पहिल्याच दिवशी मुंबई लोकलच्या 2 लाख तिकिटांची विक्री

ही घोषणा झाली तेव्हा रविवार होता. रविवार असतानाही लोकलच्या दोन लाखांहून अधिक रेल्वे तिकिटांची विक्री झाली.

ही घोषणा झाली तेव्हा रविवार होता. रविवार असतानाही लोकलच्या दोन लाखांहून अधिक रेल्वे तिकिटांची विक्री झाली.

ही घोषणा झाली तेव्हा रविवार होता. रविवार असतानाही लोकलच्या दोन लाखांहून अधिक रेल्वे तिकिटांची विक्री झाली.

  • Published by:  Pooja Vichare

मुंबई, 03 नोव्हेंबर: 31 ऑक्टोबरला कोविड प्रतिबंधक लस (Covid vaccine) घेऊन 14 दिवस झालेल्या सर्व नागरिकांना आता लोकल ट्रेनचं तिकीट (Mumbai Local Train Ticket) मिळणार असल्याचा निर्णय झाला. त्यानंतर लोकल प्रवासाच्या दैनंदिन तिकिटांची विक्री सुरु झाली. तिकिटांची विक्री सुरु होताच प्रवाशांनी तिकीट घेण्यास सुरुवात केली. 31 ऑक्टोबरपासून हा नियम लागू करण्यात आला. ही घोषणा झाली तेव्हा रविवार होता. रविवार असतानाही लोकलच्या दोन लाखांहून अधिक रेल्वे तिकिटांची विक्री झाली.

यापूर्वी दोन्ही लस घेतलेल्या नागरिकांना केवळ मासिक पास मिळत होता. मात्र, आता लोकलचं दैनंदिन तिकीट नागरिकांना मिळत आहे.

पश्चिम रेल्वे मार्गावर 83 हजार आणि मध्य रेल्वे मार्गावर 1 लाख 28 हजार रेल्वे तिकिटांची विक्री झाल्याची माहिती समोर येतेय. रेल्वेच्या या नव्या नियमानुसार, 18 आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या तसंच कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेऊन किमान 14 दिवस झालेल्या प्रवाशांना लोकल प्रवासाचे तिकिट खरेदी करण्याची मुभा आहे. तसंच 18 वर्षापेक्षा कमी वय असेल तर मुलांना त्यांचे शाळा आणि कॉलेजचे आयडी कार्ड दाखवून लोकलचे तिकिट खरेदी करावी लागेल.

हेही वाचा- न्यायालयाच्या 'त्या' आदेशाचं आर्यन खानकडून पालन?, अरबाजच्या वडिलांनी दिली माहिती 

यापूर्वी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच लोकल ट्रेनने प्रवासाची परवानगी देण्यात आली होती. त्यानतंर 15 ऑगस्टपासून लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना रेल्वे प्रवासाची परवानगी दिली. मात्र, त्यांना तिकीटाऐवजी मासिक पास घ्यावा लागत होता. पण आता राज्य सरकारने दोन्ही डोस घेतलेल्या नागिरकांना दैनंदिन तिकीट मिळावे यासंदर्भातील निर्णय घेतला आहे.

मध्य आणि पश्चिम रेल्वेवर 100 टक्के लोकल फेऱ्या

28 ऑक्टोबर 2021 पासून मध्य (Central Railway) आणि पश्चिम रेल्वेवर (Western Railway) लोकलच्या 100 टक्के फेऱ्या चालवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. सरकारनं निवडलेल्या श्रेणींनाच एसओपीनुसार प्रवास करण्याची परवानगी आहे. उपनगरीय ट्रेनमधील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन, आता 28 ऑक्टोबर 2021 पासून, मध्य आणि पश्चिम रेल्वे उपनगरीय सेवा प्री-कोविड स्तरावर म्हणजेच मध्य रेल्वे आणि पश्‍चिम रेल्वेच्या मुंबई विभागात 100% चालविण्याचा निर्णय घेतला आहे. 22 मार्च 2020 पासून कोविड-19 लॉकडाऊनमुळे रेल्वे सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली होती. नंतर 15 जून 2020 पासून, रेल्वेने राज्य सरकारने निवडलेल्या आणि रेल्वे मंत्रालयाने मंजूर केलेल्या अत्यावश्यक सेवा श्रेणींसाठी उपनगरीय सेवा सुरू केल्या.

हेही वाचा- NCB ची पुन्हा धडक कारवाई, विलेपार्लेत पकडले कोट्यवधींचे हेरॉईन

उपनगरीय गाड्यांमध्ये प्रवास करण्यासाठी राज्य सरकारने परवानगी दिलेल्या आणि रेल्वे मंत्रालयाने मंजूर केलेल्या प्रवाशांच्या श्रेणी, नंतर ऑगस्ट 2021 मध्ये आणि अलीकडच्या आठवड्यात वाढवण्यात आल्या. सध्या, मध्य रेल्वे आणि पश्‍चिम रेल्वे अनुक्रमे मध्य रेल्वे आणि पश्‍चिम रेल्वेच्या मुंबई विभागात 1702 आणि 1304 उपनगरीय सेवा चालवत आहेत, ज्या त्यांच्या एकूण उपनगरीय सेवांच्या 95.70 % आहे. आता 28 ऑक्टोबर 2021 पासून, मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे आणि पश्‍चिम रेल्वेच्या मुंबई विभागात प्री-कोविड स्तरावर 100% उपनगरीय सेवा म्हणजेच मध्य रेल्वेवर 1774 आणि पश्चिम रेल्वेवर 1367 सेवा चालवण्यात येत आहेत. फक्त राज्य सरकारने निवडलेल्या श्रेणी आणि त्यांनी जाहीर केलेल्या SOP नुसार प्रवास करण्याची परवानगी आहे.

First published:

Tags: Mumbai local