मुंबई, 3 नोव्हेंबर : टीम इंडियाचे हेड कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) यांचा कार्यकाळ या टी20 वर्ल्ड कपनंतर संपणार आहे. शास्त्रींच्या उत्तराधिकाऱ्याचा शोध बीसीसीआयनं सुरु केला आहे. नवी व्यक्ती भारतीयच असेल असं यापूर्वीच स्पष्ट करण्यात आलं आहे. या पदासाठी राहुल द्रविडचं (Rahul Dravid) नाव सर्वात आघाडीवर आहे. रवी शास्त्रीच्या सध्या सहकाऱ्यानंही कोच पदासाठी अर्ज केला आहे.
टीम इंडियाचा बॅटींग कोच विक्रम राठोड (Vikram Rathour) याने पुन्हा एकदा बॅटींग कोचच्या पदासाठी अर्ज केला आहे. शास्त्रींच्या कोचिंग स्टाफमधील राठोड या एकमेव व्यक्तीनं पुन्हा अर्ज केला आहे. शास्त्रींसह बॉलिंद कोच भरत अरुण आणि फिल्डिंग कोच आर. श्रीधर यांनी पुन्हा एकदा अर्ज केलेला नाही. राठोडने टीम इंडियाकडून 6 टेस्ट आणि 7 वन-डे मॅच खेळल्या असून त्यामुळे अनुक्रमे 131 आणि 193 रन काढले आहेत. तसंच 146 फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 11473 रन काढले आहेत.
अफगाणिस्तानच्या मॅचपूर्वी पत्रकारांशी बोलताना राठोड यांनी पुन्हा एकदा अर्ज केल्याची माहिती दिली. 'मी बॅटींग कोच पदासाठी अर्ज केला आहे.मला संधी मिळाली तर आणखी बरंच काम बाकी आहे, ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन,' असं त्यानं सांगितलं. संजय बांगरच्या जागी 2019 साली राठोडची नियुक्ती करण्यात आली होती. त्याच्याच मार्गदर्शनाखाली भारतीय टीमनं ऑस्ट्रेलियात टेस्ट सीरिज जिंकली. तसंच इंग्लंडला त्यांच्याच देशात हरवलं. विराट कोहलीसोबत काम करण्याचा अनुभव चांगला होता, असंही राठोडनं स्पष्ट केलं.
काय? अनुष्का शर्माने केलं अर्धशतक! BCCI च्या ट्वीटची तुफान चर्चा
राहुल द्रविडनं केला अर्ज
टीम इंडियाच्या हेड कोच पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑक्टोबर होती. या मुदतीच्या शेवटच्या शेवटच्या दिवशी द्रविडनं अर्ज केला आहे. राहुल द्रविड टीम इंडियाचा कोच झाला तर त्याला 10 कोटी रुपये मानधन मिळू शकतं. सध्या रवी शास्त्री यांना जवळपास 9.5 कोटी रुपये मानधन दिलं जातं. राहुल द्रविड नुकत्याच झालेल्या श्रीलंका दौऱ्यातही टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होता. रवी शास्त्री कोच असताना टीम इंडियाने परदेशात चांगली कामगिरी केली, पण टीमला आतापर्यंत एकही आयसीसी ट्रॉफी जिंकता आली नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BCCI, Cricket news, Team india