मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

भयंकर! एअरपोर्टवर सापडला नवजात बाळाचा मृतदेह, महिला प्रवाशांचे कपडे काढून केली तपासणी

भयंकर! एअरपोर्टवर सापडला नवजात बाळाचा मृतदेह, महिला प्रवाशांचे कपडे काढून केली तपासणी

26 मार्चपासून देशात कडकडीत लॉकडाऊन करण्यात आला.

26 मार्चपासून देशात कडकडीत लॉकडाऊन करण्यात आला.

जेव्हा एअरपोर्टवर एका नवजात बाळाचा मृतदेह सापडला तेव्हा येथील अधिकाऱ्यांचा संशय होता की, कोणत्या तरी प्रवाशानं या बाळाला जन्म दिला आहे.

  • Published by:  Priyanka Gawde
सिडनी, 26 ऑक्टोबर : ऑस्ट्रेलियातील एक एअरपोर्टवर भयंकर प्रकार घडला. येथील दोहा एअरपोर्टवर एका नवजात बाळाचा मृतदेह सापडल्यामुळे खळबळ उडाली होती. यानंतर विमानतळ प्राधिकरणानं डोहा ते सिडनी दरम्यान प्रवास करणाऱ्या सर्व महिलांची तपासणी केली, की या बाळाला जन्म कोणी दिला? या बाळाच्या आईचा शोध घेण्यासाठी विमानतळावरील सर्व महिलांची कपडे काढून तपासणी करण्यात आली. याबाबत ऑस्ट्रेलियन सरकारनं नाराजी व्यक्त केली असून, संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, जेव्हा एअरपोर्टवर एका नवजात बाळाचा मृतदेह सापडला तेव्हा येथील अधिकाऱ्यांचा संशय होता की, कोणत्या तरी प्रवाशानं या बाळाला जन्म दिला आहे. त्यानंर डोहा ते सिडनी जाणाऱ्या QR908 या विमानातील महिला प्रवाशांना विमानातून उतरवरत कपडे काढण्यास सांगितले. वाचा-'मित्रांशी असं बोलतात का?' भारतावर टीका करणाऱ्या ट्रम्पंना फटकारलं महिलांची कपडे काढून तपासणी करण्यात आल्याचे काही प्रवाशांनी सांगितले. एका यात्रेकरूनं द गार्डियनला दिलेल्या माहितीत, एका महिला डॉक्टरच्या उपस्थितीत महिला प्रवाशांची तपासणी करण्यात आहे. यावेळी काही महिलांचे सर्व कपडे काढून तपासणी केली गेली. वाचा-चालकाचं सुटलं नियंत्रण आणि...भरधाव ट्रॅक्टरनं तिघांना चिरडलं, पाहा LIVE VIDEO महिलांनी सांगितले की, डॉक्टर गर्भाशय आणि ओटी-पोटाची तपासणी करत होते. मात्र या तपासणीनंतर कोणत्याही प्रवाशानं या बाळाला जन्म दिला नसल्याचे समोर आले. विमानतळावरील अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, येथील टॉयलेटमध्ये बाळाचा मृतदेह सापडला होता. वाचा-अरे देवा! सायकलची घंटी चोरली म्हणून 4 वर्षांच्या चिमुकल्यानं गाठलं पोलीस स्टेशन या घटनेबद्दल नाराजी व्यक्त करताना ऑस्ट्रेलियाच्या राज्य खात्यानं म्हटलं आहे की, त्यांनी याबाबत कतार प्रशासनाकडे तक्रार नोंदवली आहे. ऑस्ट्रेलियन सरकारच्या मते कतार सरकारनं आश्वासन दिले आहे की, या प्रकरणाची सविस्तर चौकशी केली जाईल आणि संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.
First published:

पुढील बातम्या