चंदीगढ, 26 ऑक्टोबर : गेल्या काही दिवसांपासून अपघातांची मालिका वाढत असतानाचा आता एक थरारक व्हिडीओ समोर आला आहे. भरधाव ट्रॅक्टरनं तीन जणांना चिरडल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. ट्रॅक्टर घेऊन जात असताना चालकाचं नियंत्रण सुटलं आणि अचानक चाक फिरलं. त्यामुळे ट्रॅक्टर डिव्हाडरवरून उलटा फिरला आणि थेट रस्त्या सोडून फुटपाथमवर शिरला. या भरधाव ट्रॅक्टरनं तीन जणांना चिरडल्याची घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली.
हरियाणाच्या चरखी दादरी जिल्ह्यात वेगवान वाहनांचा कहर दिसला. जिल्ह्यातील महेंद्रगड बायपासजवळ रस्त्यावरुन जात असलेल्या एका अनियंत्रित ट्रॅक्टरने तिघांना धडक दिली. या अपघातात एकजण गंभीर जखमी झाला आहे. गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला पानिपत येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
हे वाचा-बाप रे! गाडी घेऊन पळाला चोर, नग्न अवस्थेत मालकानं केला पाठलाग, VIDEO VIRAL
हा व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहिलं तर या ट्रॅक्टरवरच नियंत्रण सुटल्यानं त्याचं चाक डिव्हायरडवर धडकलं आणि ट्रॅक्टर दुसरीकडे वळला आणि नियंत्रण मिळवणं कठीण झालं. भरधाव वेगात असलेल्या या ट्रॅक्टरनं तीन जणांना धडक दिली आहे. या शिवाय तिथे दुकानाजवळ असलेल्या एक व्यक्ती देखील जखमी झाला आहे.