वॉशिंग्टन, 25 ऑक्टोबर : अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि प्रतिद्वंदी जो बायडेन वेळोवेळी आपलं भारताविषयी असलेलं प्रेम व्यक्त करीत आहेत. दोन दिवसांपूर्वी शेवटच्या प्रेसिडेन्शिअल वादविवादादरम्यान ड्रम्प यांनी भारतीय हवा विषारी असल्याचे म्हटले होते. त्याचं हे विधान त्यांच्यावर उलटलं आहे. डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांनी त्यांच्या या विधानावरुन हल्लाबोल केला. ते म्हणाले की, अशा पद्धतीने आपल्या मित्रांसोबत बोललं जात नाही.
भारतासोबतच्या भागीदारीचा सन्माम
जो बायडेन म्हणाले की, ते आणि त्यांच्या पार्टीच्या उपराष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवार कमला हॅरिस, अमेरिकेसह भारतासोबताच्या भागीदारीचा सन्मान करते. राष्ट्रपती ट्रम्प भारतातील हवा विषारी असल्याचे म्हणाले होते. अशा प्रकारे आपल्या मित्रांशी बोललं जात नाही. आणि अशाप्रकारे जलवायु परिवर्तनसारख्या वैश्विक आव्हानाचा सामनाही केला जात नाही.
हे ही वाचा-आश्चर्य! कोरोनानंतर चीनमध्ये अज्ञात आजार! फक्त अमेरिकन अधिकाऱ्यांना बनवतोय शिकार
ट्रम्प म्हणाले भारतातील हवा विषारी
ट्रम्प यांनी दोन दिवसांपूर्वी राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या वादविवादादरम्यान चीन, भारत आणि रशियाबाबत म्हटलं होतं की, विषारी हवेबाबत हे देश लक्ष देत नाही. रविवारी टेनेसीच्या नॅशविलमध्ये बायडन यांच्यासोबत शेवटच्या वादविवादादरम्यान ट्रम्प म्हणाले की, चीनकडे पाहा तो किती घाणेरडा आहे. रशिया आणि भारत पाहा तेथील हवा विषारी आहे.
भारतासोबत एकत्र येऊन करणार काम
'इंडिया वेस्ट' साप्ताहिकात नुकतच प्रकाशित झालेला आपला लेख रिट्विट करीत बायडेन म्हणाले की, कमला हॅरिस आणि आमची भागीदारी खूप महत्त्वाची आहे. याबरोबरच आमच्या परराष्ट्रीय धोरण केंद्रस्थानी असेल. ते पुढे म्हणाले की, जर ते राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले तर अमेरिका आणि भारत एकत्रितपणे दहशतवादीविरोधात काम करतील.