मराठी बातम्या /बातम्या /विदेश /Shocking! युवकाने एकाच दिवसात घेतले कोरोना लसीचे 10 डोस; वाचा पुढे काय झालं

Shocking! युवकाने एकाच दिवसात घेतले कोरोना लसीचे 10 डोस; वाचा पुढे काय झालं

एका व्यक्तीने चोवीस तासाच्या आत कोरोना लसीचे 10 डोस घेतल्याची घटना समोर आली आहे. यानंतर आता आरोग्य मंत्रालयाने चौकशीचे आदेश दिले आहेत

एका व्यक्तीने चोवीस तासाच्या आत कोरोना लसीचे 10 डोस घेतल्याची घटना समोर आली आहे. यानंतर आता आरोग्य मंत्रालयाने चौकशीचे आदेश दिले आहेत

एका व्यक्तीने चोवीस तासाच्या आत कोरोना लसीचे 10 डोस घेतल्याची घटना समोर आली आहे. यानंतर आता आरोग्य मंत्रालयाने चौकशीचे आदेश दिले आहेत

नवी दिल्ली 12 डिसेंबर : एका व्यक्तीने चोवीस तासाच्या आत कोरोना लसीचे 10 डोस घेतल्याची घटना समोर आली आहे (Man Taken 10 Dose of Corona Vaccine in 1 Day). यानंतर आता आरोग्य मंत्रालयाने चौकशीचे आदेश दिले आहेत. ही घटना न्यूझीलंडमधील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यासाठी या व्यक्तीने एकाच दिवसात अनेक लसीकरण केंदांचा (Vaccination Center) दौरा केला आणि त्याला प्रत्येक डोससाठी पैसे दिले गेले होते.

Omicron व्हेरिएंटपासून बचाव करण्यासाठी बूस्टर डोस एकमेव पर्याय?, WHO म्हणत...

न्यूझीलंडमधील आरोग्य मंत्रालयाच्या कोविड-19 लस आणि लसीकरण कार्यक्रमाचे ग्रुप मॅनेजर अॅस्ट्रिड कॉर्निफ म्हणाले, 'मंत्रालयाला याची माहिती देण्यात आली आहे, आम्ही ही बाब अतिशय गांभीर्याने घेत आहोत. या परिस्थितीबद्दल खूप चिंतित आहोत आणि योग्य एजन्सींसोबत काम करत आहोत. जर कोणी लसीचे ओव्हरडोज घेतले असतील तर लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा'. मात्र, ही घटना कुठे घडली याची मंत्रालयाकडून पुष्टी केली जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रकरणाबाबत, लसीकरण सल्लागार केंद्राचे वैद्यकीय संचालक आणि ऑकलँड विद्यापीठाच्या प्रोफेसर निक्की टर्नर यांनी सांगितले की, एका दिवसात इतक्या लसी घेण्याबाबत कोणताही डेटा उपलब्ध नव्हता. ही लस प्राथमिक माहितीच्या आधारे तयार करण्यात आली आहे. ही लस मानवी शरीरात चांगली रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करण्याचं आणि लोकांना सुरक्षित ठेवण्याचं काम करते. मात्र लसीचे अनेक डोस घेतल्यास याचे दुष्परिणाम जास्त आहेत.

Omicron रोखण्यासाठी मुंबई मनपा धारावीत राबवणार 'T-4' फॉर्म्युला, वाचा सविस्तर

निक्की टर्नर यांनी सांगितलं, 'हे निश्चितच योग्य नाही. लसीचा ओव्हरडोज घेतल्यावर एखाद्या व्यक्तीवर कोणत्या प्रकारचे दुष्परिणाम होतात याचा आमच्याकडे कोणताही पुरावा नाही. मात्र हे सुरक्षित नाही, या कृतीमुळे त्या व्यक्तीच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. इतरांच्या ओळखपत्राचा फायदा घेऊन लोक अनेक वेळा कोरोनाची लस घेऊ शकतात, असा इशारा यापूर्वीच एका अहवालात देण्यात आला होता.

First published:

Tags: Corona vaccination, Corona vaccine