मराठी बातम्या /बातम्या /देश /

Covid 19: Omicron व्हेरिएंटपासून बचाव करण्यासाठी बूस्टर डोस प्रभावी ठरणार? WHO नं दिलं उत्तर

Covid 19: Omicron व्हेरिएंटपासून बचाव करण्यासाठी बूस्टर डोस प्रभावी ठरणार? WHO नं दिलं उत्तर

नवीन ओमायक्रॉन व्हेरिएंट (Omicron variant)आणि त्याचा झपाट्याने प्रसार होण्याच्या धोक्यामुळे जगभरात दहशत पसरली आहे.

नवीन ओमायक्रॉन व्हेरिएंट (Omicron variant)आणि त्याचा झपाट्याने प्रसार होण्याच्या धोक्यामुळे जगभरात दहशत पसरली आहे.

नवीन ओमायक्रॉन व्हेरिएंट (Omicron variant)आणि त्याचा झपाट्याने प्रसार होण्याच्या धोक्यामुळे जगभरात दहशत पसरली आहे.

  • Published by:  Pooja Vichare

नवी दिल्ली, 11 डिसेंबर: कोरोना व्हायरसचा (Corona virus)नवीन ओमायक्रॉन व्हेरिएंट (Omicron variant)आणि त्याचा झपाट्याने प्रसार होण्याच्या धोक्यामुळे जगभरात दहशत पसरली आहे. Omicron व्हेरिएंटपासून बचाव करण्यासाठी सरकारांनी बूस्टर डोसबाबत विचार करण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक शास्त्रज्ञ आणि सरकारनी तिसऱ्या बूस्टर डोसच्या ( booster doses) गरजेवर भर दिला आहे. प्राथमिक निष्कर्षांनंतर असे आढळून आले आहे की ओमायक्रॉन खूप वेगानं पसरण्याची शक्यता आहे.

या व्हेरिएंटपासून बचाव करण्याासाठी अमेरिका, ब्रिटन आणि दक्षिण कोरियासारख्या आधुनिक देशांनी मोठी पावले उचलली आहेत. यामध्ये अमेरिकेनं किशोरवयीन मुलांचं लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. तर ब्रिटन आणि दक्षिण कोरियानं तिसरा डोस देण्यासाठी वेटिंगचा वेळ कमी करुन अर्धा केला आहे.

हेही वाचा- मधुचंद्र होताच नवऱ्यानं उचललं टोकाचं पाऊल, उध्वस्त झालं नववधूचं आयुष्य

अनेक सरकार लसीचे अतिरिक्त डोस सुरक्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. BioNTech चे संस्थापक उगुर साहिन यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला सांगितलं की, नवीन व्हेरिएंटशी लढण्यासाठी MRNA शॉट, तीन डोस लस असणं आवश्यक आहे. हा तिसरा डोस तीन महिन्यांत घेता येतो.

दरम्यान, Omicron विरुद्ध रश टू बूस्टरची रणनीती योग्य आहे का, हा प्रश्न अजूनही कायम आहे. बूस्टर डोस मिळाल्यास धोका टाळता येईल का? कोरोनाचे इतर व्हेरिएंट आल्यावरही हेच करावं लागेल का?

जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे की, जगभरात लसीची पोहोच सुनिश्चित करण्यावर भर दिला पाहिजे. काही श्रीमंत सरकार बूस्टर डोसकडे जात आहेत,मात्र त्यांनी तसं करणं टाळलं पाहिजे. त्यांनी हे समजून घेतले पाहिजे की जगात असे लोक आहेत ज्यांना पहिली लस देखील मिळालेली नाही. ओमायक्रॉनसारख्या नवीन व्हेरिएंटला प्रतिबंध करण्यासाठी, जगभरात लसीकरण करणं आवश्यक आहे.

हेही वाचा- चिंता वाढवणारी बातमी, Omicron चे सर्वाधिक रुग्ण आपल्याच राज्यात

संशोधकांनी सावध केलं की, सध्याच्या सहा महिन्यांच्या नियमापेक्षा कमी अंतरानं बूस्टर डोस लागू केल्यानं रोग प्रतिकारशक्ती वाढेल की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. हाँगकाँग विद्यापीठातील विषाणूशास्त्रज्ञ जिन डोंगयान म्हणाले की, तीन किंवा सहा महिन्यांनंतर त्यांची आवश्यकता आहे की नाही याबद्दल अद्याप कोणताही डेटा नाही आणि त्यात फरक असू शकतो.

First published:

Tags: Corona vaccination, Coronavirus