Home /News /mumbai /

Omicron रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिका राबवणार धारावी पॅटर्न 2, वाचा काय आहे हा 'T-4' फॉर्म्युला

Omicron रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिका राबवणार धारावी पॅटर्न 2, वाचा काय आहे हा 'T-4' फॉर्म्युला

Omicron रोखण्यासाठी मुंबई मनपा धारावीत राबवणार 'T-4' फॉर्म्युला, वाचा सविस्तर

Omicron रोखण्यासाठी मुंबई मनपा धारावीत राबवणार 'T-4' फॉर्म्युला, वाचा सविस्तर

Omicron case in Dharavi, bmc will implement T4 formula now: कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटने धारावीत शिरकाव केला आहे. धारावीत ओमायक्रॉनचा शिरकाव केल्याने चिंता वाढली आहे.

    मुंबई, 11 डिसेंबर : ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने (Omicron Coronavirus) जगभरात चिंतेचे वातावरण आहे. त्याच दरम्यान या ओमायक्रॉनने मुंबईतील धारावीत शिरकाव (Omicron case detect in Dharavi Mumbai)  केला. धारावीत ओमायक्रॉनचा शिरकाव झाल्याने प्रशासनासमोर नवं आव्हान उभं राहिलं आहे. धारावी पॅटर्न यशस्वी झाल्यावर आता मुंबई महानगरपालिकेने धारावीतील ओमायक्रॉनचा संसर्ग रोखण्यासाठी धारावी पॅटर्न 2 राबवण्याचा निर्णय घेतला आहे. (BMC will implement Dharavi pattern 2 to prevent omicron) मुंबई महानगरपालिकेच्या धारावी पॅटर्नची चर्चा केवळ मुंबई, महाराष्ट्र आणि देशातच नाही तर जगभरात झाली होती. धारावी पॅटर्न यशस्वी झाल्यावर आता मुंबई महानगरपालिकेने धारावी पॅटर्न 2 राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापद्धतीने मुंबई मनपाने नियोजन सुद्धा केलं आहे. धारावी पॅटर्न 2 मध्ये T-4 फॉर्म्युला राबवण्यात येणार आहे. एबीपी माझा वृत्तवाहिनीने या संदर्भात वृत्त दिलं आहे. धारावीत टी-4 फॉर्युला राबवण्यात येणार आहे. ट्रेसिंग, ट्रॅकिंग, टेस्टिंग आणि ट्रिटिंग असा टी-4 फॉर्म्युला असणार आहे. यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून जास्तित जास्त लोकांची टेस्ट करण्यात येणार आहे. याच्या माध्यमातून लवकरात लवकर बाधितांना ओळखून त्यांच्यावर उपचार करण्यात येणार आहेत. ओमायक्रॉन बाधित जो रुग्ण धारावित आढळला आहे त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांची चाचणी करण्यात आली. यात कुणीही पॉझिटिव्ह आढळलं नव्हतं. त्यालाही तात्काळ सेवन हिल्स परिसरात आयसोलेटेड करण्यात आलं होतं. मोफत टेस्टिंग जास्तित जास्त उपलब्ध करुन देत आहोत. वाचा : Omicron व्हेरिएंटचं सावट..! दिवसेंदिवस रुग्णांमध्ये वाढ, सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात धारावीतील 80 टक्के नागरिक सार्वजनिक शौचालय वापरतात. त्यामळे सार्वजनिक शौचालयाचं वेळोवेळी सॅनिटायझेशन करण्यात येणार आहे. जेणेकरुन तेथून संसर्ग होणार नाही. लसीचा दुसरा डोस शिल्लक असल्लया नागरिकांना शोधून तसेच जनजागृती करत लसीकरण वाढवण्यावर भर दिला जात आहे. मुंबईत Omicron वाढतोय मुंबईमध्ये ओमायक्रॉन बाधित रुग्णांची संख्या आता 5 वर पोहोचली आहे. याआधी मुंबईत दोन रुग्ण आढळले होते. तर महाराष्ट्रात रुग्णांची संख्याही 17 वर पोहोचवली आहे. बृहन्मुंबई महानगर पालिका क्षेत्रात 3 रुग्णांना ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग झाल्याचे‌ निदान झाले आहे. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या 5 वर पोहोचली आहे. या रुग्णांना कोणतीही गंभीर लक्षणे नाहीत. तथापि खबरदारीची उपाययोजना म्हणून संबंधित रुग्ण महापालिकेच्या रुग्णालयात विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. धक्कादायक म्हणजे, या 7 रुग्णांपैकी चार जणांनी कोरोनाची लस घेतलेली होती. तर एका व्यक्तीने एकच कोरोनाचा डोस घेतला होता. धक्कादायक म्हणजे, या सात जणांमध्ये एका 3.5 वर्षांच्या मुलाचा समावेश आहे. या सातही जणांना क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले आहे.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: BMC, Coronavirus, Dharavi, Mumbai

    पुढील बातम्या