काबूल, 08 ऑक्टोबर: अफगाणिस्तानात तालिबाननं (Taliban in Afghanisatn) कब्जा मिळवल्यानंतर सामान्य नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. सामान्य नागरिकांना जगणं मुश्किल झालं आहे. जे सरकारी अधिकारी आणि कर्मचारी आहेत जे देशाच्या अश्रफ घनी सरकारशी एकनिष्ठ होते, त्यांची सर्वात वाईट अवस्था आहे. अफगाणिस्तानचे पत्रकार हिजबुल्लाह खान (Hizbullah Khan) यांनी एक व्हिडिओ ट्विट केला आहे. ज्यामध्ये तालिबान लढाऊ घरोघरी जाऊन सरकारी अधिकारी आणि अफगाण सैनिकांना पकडत आहेत.
काय आहे व्हिडिओमध्ये
पत्रकार हिजबुल्लाह खान यांनी ट्विट केलं की, गेल्या सरकारचे अधिकारी आणि अफगाण सैनिकांना पकडण्यासाठी तालिबानचं डोअर- टू- डोअर ऑपरेशन संपूर्ण अफगाणिस्तानात सुरु आहे.
Taliban's door to door operations are still underway across Afghanistan, capturing previous Govt officials & Army personnel. pic.twitter.com/Uhrfpi7KZn
— Hizbullah Khan (@HizbkKhan) October 7, 2021
या व्हिडिओमध्ये काही सशस्त्र तालिबान लढाऊ खुल्या गाड्यात दिसत आहेत. व्हिडिओमध्ये दोन लोकांना हात बांधून अटक केलेलं दिसत आहे. गाडीच्या मागील बाजूस पांढऱ्या रंगाचं वाहन आहे जे खुल्या गाडीच्या मागून- मागून येत आहे.
कोण आहेत हिजबुल्लाह खान?
अफगाणिस्तानचे स्वतंत्र पत्रकार हिजबुल्लाह खान आपल्या ट्वीटद्वारे सातत्याने जगाला देशातील सद्य परिस्थितीची जाणीव करून देत आहेत. जेरुसलेम पोस्ट, द इंडिपेंडंट, द ग्लोब पोस्ट, द डिप्लोमॅट यासारख्या जागतिक वर्तमानपत्रांमध्ये त्यांचे लेख प्रकाशित झालेत.
हेही वाचा- IPL 2021: KKR वाढवणार सर्वांची डोकेदुखी, आक्रमक खेळाडू येणार टीममध्ये परत
तालिबानीनी चोरीच्या आरोप असलेल्या तिघांना घातल्या गोळ्या
याच आठवड्यात तालिबानने अफगाणिस्तानच्या हेरात प्रांतात चोरीच्या आरोपाखाली तीन लोकांना गोळ्या घातल्या त्यानंतर लोकांमध्ये दहशत पसरवण्यासाठी मृतदेह रस्त्यातच क्रेनवर लटकवून ठेवलं. अफगाणिस्तान ताब्यात आल्यानंतर तालिबान्यांनी सरकार स्थापन केल्यावर सुरक्षेची अनेक आश्वासनं दिली होती. मात्र आता ही घटना पाहता तालिबान अजिबात बदललेला नाही, उलट पूर्वीपेक्षाही अधिक क्रूर झाला आहे, हेच सिद्ध होतं.
हेही वाचा- मुंबई विमानतळावर सावळा गोंधळ, प्रवाशांची तौबा गर्दी; Must Watch
डेली मेलने दिलेल्या रिपोर्टनुसार तालिबानने तीन अफगाणी नागरिकांना चोरीच्या आरोपावरून थेट देहांताची शिक्षा दिली. या लोकांचे हेरात प्रांतातून अपहरण करण्यात आलं आणि नंतर गोळ्या घालण्यात आल्या. तालिबान आता अल्पसंख्य असलेल्या हाजारा समुदायाला लक्ष्य करत आहे. तालिबान्यांनी हजारा मुस्लिम समुदायाच्या 13 लोकांची निर्घृण हत्या केली आहे. त्यापैकी एक 17 वर्षीय मुलगी आहे. 300 तालिबानी आतंकवाद्यांनी 30 ऑगस्ट रोजी खिद्र जिल्ह्यात अफगाणिस्तान राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या (ANSF) 11 माजी सदस्यांची हत्या केली होती.
तालिबानच्या पहिल्या राजवटीच्या काळात 1996 आणि 2001 या वर्षांमध्ये हजारा या समाजावर खूप अत्याचार झाले होते. पंरतु आता तालिबाननं पुन्हा सत्ता हस्तगत केल्यानंतर आता त्यांनी पुन्हा त्यांना टार्गेट करायला सुरूवात केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Afghanistan, Taliban