मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021: KKR वाढवणार सर्वांची डोकेदुखी, आक्रमक खेळाडू येणार टीममध्ये परत

IPL 2021: KKR वाढवणार सर्वांची डोकेदुखी, आक्रमक खेळाडू येणार टीममध्ये परत

यूएईमध्ये सुरू असलेल्या आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात (IPL 2021 Phase 2) कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) दमदार कामगिरी केली आहे. या टीमसाठी आणखी एक चांगली बातमी असून त्यामुळे 'प्ले ऑफ'मधील अन्य टीमची डोकेदुखी वाढणार आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

मुंबई, 8 ऑक्टोबर: कोलकाता नाईट रायडर्सनं गुरुवारी झालेल्या मॅचमध्ये राजस्थान रॉयल्सचा (Kolkata Knight Riders vs Rajasthan Royals) 86 रननं पराभव केला. या मोठ्या विजयानंतर केकेआरचा (KKR) रनरेट आणखी भक्कम झाला आहे. त्यामुळे त्यांचा 'प्ले ऑफ'मधील (IPL 2021 Playoffs) प्रवेश हा जवळपास नक्की झाला आहे. यूएईमध्ये सुरू असलेल्या आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात (IPL 2021 Phase 2) कोलकातानं दमदार कामगिरी केली आहे. या टीमसाठी आणखी एक चांगली बातमी असून त्यामुळे 'प्ले ऑफ'मधील अन्य टीमची डोकेदुखी वाढणार आहे.

केकेआरचा जखमी ऑल राऊंडर आंद्रे रसेल (Andre Russell) प्ले ऑफच्या मॅचपर्यंत पूर्ण फिट होईल. असा विश्वास केकेआरचे मुख्य सल्लागार डेव्हिड हसीनं (David Hussey) व्यक्त केला आहे. 'रसेलची बुधवारी फिटनेस टेस्ट घेण्यात आली. तो लवकरच टीममध्ये परत येईल. आयपीएल 'प्ले ऑफ' साठी तो कठोर मेहनत घेत आहे. त्याचं खेळणं हे फक्त आमच्यासाठी नाही तर संपूर्ण स्पर्धेसाठी महत्त्वाचे आहे. तो एक जागतिक स्तराचा क्रिकेटपटू आहे. त्याच्यामुळे प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन होते.' असं हसीनं सांगितलं.

कोलकातानं दिलेल्या 172 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानला फक्त 85 रनपर्यंतच मजल मारता आली. या सामन्यात राजस्थानने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, पण कोलकात्याने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून 171 रन केले. ओपनर शुभमन गिलने 56 तर व्यंकटेश अय्यरने 38 रनची खेळी केली. या दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी 79 रनची पार्टनरशीप झाली. राजस्थानकडून ख्रिस मॉरिस, चेतन सकारिया, राहुल तेवतिया आणि ग्लेन फिलिप्स यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.

IPL 2021 Playoffs: ....तर हैदराबाद विरुद्ध एकही बॉल न खेळता मुंबई इंडियन्स होणार आऊट!

प्ले-ऑफच्या चारही टीम ठरल्या

या सामन्यासोबतच आयपीएल प्ले-ऑफच्या आता चारही टीम ठरल्या आहेत. दिल्ली, चेन्नई, आरसीबी आणि कोलकात्याच्या टीम प्ले-ऑफमध्ये दाखल झाल्या आहेत. दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर चेन्नई राहणार का आरसीबी याचा निर्णय शुक्रवारी होणाऱ्या मॅचनंतर होणार आहे. प्ले-ऑफमध्ये पहिल्या दोन क्रमांकावर राहणाऱ्या टीमना फायनलमध्ये पोहोचण्यासाठी दोनवेळा संधी मिळते.

First published:

Tags: IPL 2021, KKR