मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

मुंबई विमानतळावर Unlimited प्रवाशांची गर्दी, अनेकांच्या फ्लाईट मिस, Watch Video

मुंबई विमानतळावर Unlimited प्रवाशांची गर्दी, अनेकांच्या फ्लाईट मिस, Watch Video

मुंबई विमानतळावरील (Mumbai airport)  काही फोटो व्हायरल (viral photos) झाले आहेत.

मुंबई विमानतळावरील (Mumbai airport) काही फोटो व्हायरल (viral photos) झाले आहेत.

मुंबई विमानतळावरील (Mumbai airport) काही फोटो व्हायरल (viral photos) झाले आहेत.

  • Published by:  Pooja Vichare

मुंबई, 08 ऑक्टोबर: मुंबई विमानतळावरील (Mumbai airport) काही फोटो व्हायरल (viral photos) झाले आहेत. या व्हायरल फोटोंमध्ये विमानतळावर प्रवाशांची (passengers) अभूतपूर्व गर्दी (unprecedented crowd) पाहायला मिळत आहे. हे फोटो आज सकाळचे आहेत.

आज सकाळी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रचंड गर्दी झाली होती. विमानतळावर प्रवाशांची गर्दी नियंत्रणाबाहेर गेली होती. यामुळे 30 हून अधिक प्रवाशांची फ्लाईट मिस झाली आहे.

आम्हाला या गर्दीचा अंदाज होता आणि त्यामुळे काही विमान कंपन्यांना सांताक्रूझ टर्मिनलवर हलवण्यात आलं होतं, असं मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (एमआयएएल) च्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं आहे.

सध्या हळूहळू अनलॉक होत आहे. त्यामुळे विमान प्रवाशांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्याताच प्रत्यत मुंबई विमानतळावर पाहायला मिळाला.

हेही वाचा- चीनच्या समुद्रात USच्या आण्विक पाणबुडीचा रहस्यमय अपघात, चर्चांना उधाण

आज सकाळी मुंबई विमानतळाच्या टर्मिनल 2 वर अभूतपूर्व गर्दी झाली होती. त्यातच विमानतळाचं प्रवेशद्वार आणि चेक इन काऊंटरवर कमी सुरक्षा रक्षक तैनात होते. त्यामुळे तिथेही प्रवाशांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. अचानक वाढलेली गर्दीमुळे काही प्रवाशांना आपली फ्लाईट मिस करावी लागली आहे.

गर्दी पाहून काही प्रवाशी संतप्त झाले आणि त्यांनी सुरक्षा रक्षक आणि विमानतळ व्यवस्थापकांना जाब विचारण्यास सुरुवात केली. काहींनी तर क्यू लॉक तोडून आत प्रवेश शिरण्याचाही प्रयत्न केला. या गर्दीमुळे बरीच गोंधळाची स्थिती निर्माण झालेली पाहायला मिळाली.

हेही वाचा- T20 वर्ल्ड कपसाठी बायो प्रोटोकॉल जारी, वाचा खेळाडू संक्रमित झाला तर काय होणार? 

या गोंधळातच 6E5731 हे विमान मुंबई हैदराबाद नियोजित करण्यात आले होते. मात्र 15 हून अधिक प्रवाशी वेळेवर पोहोचून त्यांना विमानात प्रवेश करता आला नाही.त्यामुळे हे विमान प्रवाशांना न घेताच निघून गेलं.

First published:

Tags: Airport, Mumbai News