प्योंगयांग, 06 मे : उत्तर कोरियाचे (North Korea) हुकुमशाह किम जोंग यांचा एक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी समोर आला होता. 1 मे रोजी किम जोंग यांचा रस्त्यावर फिरतानाचा व्हिडीओ समोर आला होता, त्यानंतर त्यांच्या मृत्यूच्या बातम्यांना पूर्णविराम लागला होता. मात्र आता किम जोंग यांच्याबाबत आणखी एक धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. काही वृत्तसंस्थेंच्या मते किम जोंग यांचा प्रसारित करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये बॉडी डबलचा (त्यांच्यासारखीच दिसणारी व्यक्ती) वापर करण्याच आला होता.
डेली मेलच्या रिपोर्टनुसार, किम जोंग गेले 20 दिवसांपासून गायब असल्याचे आणि त्यांच्या मृत्यूच्या बातम्या आल्यानंतर किम जोंग जगासमोर आले. मात्र ते किम जोंग नसून त्यांच्यासारखी दिसणारी ती व्यक्ती होती, असे समोर आले आहे. उत्तर कोरियाच्या माध्यमांनी 1 मेरोजी किम जोंग खताच्या कारखान्याचं उद्घाटन करतानाचा व्हिडीओ प्रसारित केला होता. कारखान्याची पाहाणी करतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये किम यांची प्रकृती व्यवस्थित दिसत आहे.
वाचा-उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांचा VIDEO समोर, पाहा काय करतायत?
इंटरनेटवर किम सारख्या दिसणाऱ्या व्यक्तीचे फोटो व्हायरल
दरम्यान इंटरनेटवर सध्या किम जोंग यांसारख्या दिसणाऱ्या व्यक्तीचे फोटो व्हायरल होत आहेत. बर्याच लोकांनी असे म्हटले आहे की हुकूमशहा बऱ्याचदा असे डुप्लिकेट वापरतात. याआधी हिटलर, स्टॅलिन ते सद्दाम हुसेन यांनीही त्यांच्या सारख्या दिसणाऱ्या लोकांचा वापर केला आहे. बर्याच लोकांनी म्हटले आहे की किमने यांचा व्हायरल होत असलेला व्हिडीओ खोटा असून, ते ते खरे किम जोंग नाहीत, व्हिडीओमध्ये त्यांच्यासारख्या दिसणारा व्यक्ती आहे. काही लोकांनी किम जोंग यांचा चेहरा आणि डुप्लिकेटचा चेहऱ्याचे फोटो व्हायरल केले आहेत.
वाचा-साऱ्या जगापासून लपून 'किम जोंग' बनवत होता TikTok व्हिडीओ? वाचा काय आहे सत्य
#WATCH North Korea's Kim Jong Un makes first public appearance in 20 days, at the completion of a fertilisers plant in Pyongyang pic.twitter.com/1OY8W8ORD7
— ANI (@ANI) May 2, 2020
वाचा-किम जोंग उननंतर कोण? उत्तर कोरियात 'कहानी में ट्विस्ट'; सत्तासंघर्ष अटळ
हा खरा किम नाही, माजी खासदारांचा दावा
ब्रिटनचे माजी खासदार लुइस मेन्श यांनीही असा दावा केला आहे, व्हिडीओमध्ये दिसणारे किम नाही आहेत. फोटोमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीच्या दांत आणि चेहऱ्यांमध्ये फरक आहे. माजी खासदार लुइस मेन्श यांनी लिहिले आहे की ही एकसारखी व्यक्ती नाही. पण मी यावर वाद घालू शकत नाही. माझी माहिती बरोबर नाही हे शक्य नाही. हे चुकीचे असू शकत नाही. असे म्हटले जात आहे की काही लोक किम यांचे जुने फोटो वापरून व्हायरल करत आहेत. आता वय आणि आहारामुळे किम यांचा चेहरा बदलला आहे.
20 दिवसांनंतर दिसले किम
KCNAने दिलेल्या वृत्तानुसार किम जोंग उन यांनी सुनचिओनमध्ये एका कारखान्याच्या उद्घाटन समारंभाला हजेरी लावली होती. हे ठिकाण राजधानी प्योंगयांगच्या जवळ आहे. किमची बहीण किम यो जोंग देखील या कार्यक्रमाला उपस्थित होती. 1 एप्रिल रोजी जनतेसमोर ते आले होते त्यानंतर ते गायब झाले आणि 1 मे रोजी उद्घाटन सोहळ्यात दिसले. मधल्या 20 दिवसांमध्ये ते कुठे होते याबाबत कोणतीही माहिती समोर येऊ शकली नाही.