प्योंगयांग, 02 मे : उत्तर कोरियाचे हुकूमशाहा किम जोंग उन यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालवल्याची आणि ते जिवंत आहेत की नाही अशा अनेक वावड्या उठवल्या होत्या. 20 दिवसांनंतर 1 मे रोजी या सगळ्या चर्चांना पूर्णविराम मिऴला आहे. याआधी किम जोंग उन यांचे फोटो समोर आले होते. खताच्या कारखान्याचं उद्घाटन करताना किम जोग उन दिसले होते. आता या कारखान्याची पाहाणी करतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता त्यांची प्रकृती व्यवस्थित दिसत आहे. किम जोंग या व्हिडीओमध्ये काही लोकांसोबत चर्चा करत कारखान्याची पाहाणी करत असल्याचं दिसत आहे. गेल्या 20 दिवसात ते कुठे होते? त्यांच्या प्रकृतीबाबतही अनेक सवाल उपस्थित केले जात होते. तीन आठवड्यानंतर दिसल्याचं सगळ्यात पहिल्यांदा उत्तर कोरियातील न्यूज एजन्सीनं माहिती दिली होती.
#WATCH North Korea's Kim Jong Un makes first public appearance in 20 days, at the completion of a fertilisers plant in Pyongyang pic.twitter.com/1OY8W8ORD7
— ANI (@ANI) May 2, 2020
हे वाचा- लॉकडाऊनमध्ये अडवलं म्हणून पोलीस अधिकाऱ्याला फरफटत नेलं, पाहा VIDEO KCNAने दिलेल्या वृत्तानुसार किम जोंग उन यांनी सुनचिओनमध्ये एका कारखान्याच्या उद्घाटन समारंभाला हजेरी लावली होती. हे ठिकाण राजधानी प्योंगयांगच्या जवळ आहे. किमची बहीण किम यो जोंग देखील या कार्यक्रमाला उपस्थित होती. 1 एप्रिल रोजी जनतेसमोर ते आले होते त्यानंतर ते गायब झाले आणि 1 मे रोजी उद्घाटन सोहळ्यात दिसले. मधल्या 20 दिवसांमध्ये ते कुठे होते याबाबत कोणतीही माहिती समोर येऊ शकली नाही. गेल्या काही दिवसांपासून किम जोंग कुठे आहेत याबाबत उलट सुलट चर्चा केल्या जात होत्या. किम जोंग यांच्यावरची शस्त्रक्रिया अयशस्वी झाली आणि ते कोमात गेले असल्याची चर्चा होती. त्यांच्या प्रकृतीबाब या देशाने अद्याप याबाबत कुठलंही अधिकृत स्पष्टीकरण दिलेलं नाही. किम जोंग उन कदाचित जिवंत नसावेत, अशाही वावड्या उठल्या होत्या. मात्र शुक्रवारी एका समारंभात कारखान्याचं उद्घाटन करताना दिसल्यानं या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. हे वाचा- या झोनमध्ये राहणाऱ्यांसाठी Online Shopping सुरू; खरेदी करू शकता मोबाईल, फ्रिज संपादन- क्रांती कानेटकर