काठमांडू, 18 जून : देशाचा राजकीय नकाशा अधिकृतपणे बदलण्यासाठी नेपाळच्या संसदेत आज घटना दुरुस्तीचं विधेयक मांडण्यात आलं आणि ते एकमताने मंजूरही करण्यात आलं. भारतातल्या काही प्रदेशाचा समावेश नेपाळच्या या नव्या नकाशात करण्यात आला आहे.
भारतीय हद्दीतल्या प्रदेशाला स्वतःच्या देशात दाखवण्याच्या या कृतीचा भारताने निषेध केला आहे. अशा प्रकारे भारतीय प्रदेश स्वतःचा असल्याचं भासवण्याला काही अर्थ नाही, अशी भारताची प्रतिक्रिया आहे.
नेपाळच्या करिष्ठ सभागृहाने हा नकाशा अगोदरच मंजूर केला होता आता नॅशनल असेंब्लीने म्हणजे वरिष्ठ सभागृहानेसुद्धा या नकाशाला 57 विरुद्ध शून्य मतांनी मंजुरी दिली आहे. के. पी. शर्मा ओली या नेपाळी पंतप्रधानांनी गेल्या काही दिवसांत भारतविरोधी भूमिका बोलून दाखवली होती.
Nepal: The New Map Amendment Bill (Coat of Arms) proposes change in the map of Nepal to include parts of Indian territory. https://t.co/lFhn6BW2DW
— ANI (@ANI) June 18, 2020
नेपाळने नकाशा बदलून अशा प्रकारे भारतीय प्रदेशावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न चालवला होता, याची दखल भारतीय लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनीसुद्धा घेतली. नेपाळचा बोलवता धनी कोण हे जगाला माहीत आहे, असं त्यांनी चीनचं नाव न घेता म्हटलं होतं.
चीनला धडा शिकवण्यासाठी भारताची तयारी, सीमारेषेवर हालचालींना वेग
एका बाजूला चीनने लडाखच्या पूर्व भागात प्रत्यक्ष ताबारेषेजवळ (LAC ) संघर्ष सुरू केला असतानाच नेपाळची कुरघोडी सुरू आहे.
मे महिन्यापासून दोन देशांमधल्या मैत्रीपूर्ण संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नेपाळ सीमेजवळ लिपुलेख खिंड ते उत्तराखंडमधल्या धारचुला या ठिकाणाला जोडणारा 80 किमी च्या रस्त्याच्या कामाचं उद्धाटन केलं. हा रस्ता सामरिक दृष्टीने महत्त्वाचा आहे. नेपाळने हा रस्ता आपल्या हद्दीतून जात असल्याचं सांगत त्याला विरोध दर्शवला आहे.
या रस्त्याच्या उद्घाटनानंतर नेपाळने नवा नकाशा तयार केला आणि त्यात लिपुलेखसह कालापानी आणि लिम्पियाधुरा या ठिकाणांचा समावेश आपल्या देशात दर्शवला.
अन्य बातम्या
मोठी कारवाई, जवानांकडून पाकच्या चौक्या उद्ध्वस्त, 4 सैनिकांचा मृत्यू
ना औषध ना लस! आता 'या' पद्धतीनं होणार कोरोनावर उपचार, भारतीय डॉक्टरांचा दावा