मोठी कारवाई, जवानांकडून पाकच्या चौक्या उद्ध्वस्त, 4 सैनिकांचा मृत्यू

मोठी कारवाई, जवानांकडून पाकच्या चौक्या उद्ध्वस्त, 4 सैनिकांचा मृत्यू

पीओकेच्या बीआयएमबी, नीलम आणि नकयाल सेक्टरमध्ये भारताने पाकिस्तानमधील अनेक चौक्या उडवल्या

  • Share this:

श्रीनगर, 18 जून : भारत-पाकिस्तान सीमारेषेवरून सर्वात मोठी बातमी आहे. वारंवार पाकिस्तानकडून सुरू असलेल्या शस्रसंधीच्या उल्लंघनाला भारतीय सैन्य दलानं चोख प्रत्युत्तर दिलं आहे. या कारवाईमध्ये भारतीय सैन्य दलानं पाकव्यप्त काश्मीरमधील अनेक चौक्या उद्ध्वस्त केल्या आहेत. जवानांच्या या कारवाईमध्ये पाकिस्तानच्या 4 सैनिकांचा मृत्यू तर अनेक सैनिक जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

भारतीय सैन्याने बुधवारी रात्री ही कारवाई केली. पाकिस्तानच्या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना पीओकेच्या बीआयएमबी, नीलम आणि नकयाल सेक्टरमध्ये भारताने पाकिस्तानमधील अनेक चौक्या उडवल्या. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तान नियंत्रण रेषेवरील शस्रसंधीचं सातत्यानं उल्लंघन करीत आहे. भारतीय सैन्याच्या कारवाईनंतर पाकिस्तानी सैनिक चौकी सोडून पळून गेले.

याआधी बुधवारी जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं होतं. वेगवेगळ्या भागांमध्ये पाकिस्तानी सैनिकांनी गोळीबार सुरू केला होता. पाक सैनिकांच्या गोळीबाराला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलं. एकीकडे लडाखमध्ये गलवान खोऱ्यात चीन आणि भारत यांच्यामधील संर्घषामुळे तणाव असतानाच पाकिस्तानकडून सातत्यानं कुरापती सुरू आहे. या कुरघोड्यांना भारतीय सैन्य दलानं चोख प्रत्युत्तर देत पाकच्या चौक्या उद्ध्वस्त केल्या आहेत.

संपादन- क्रांती कानेटकर

First published: June 18, 2020, 3:20 PM IST

ताज्या बातम्या