कॅलिफोर्निया, 04 एप्रिल : कोरोना व्हायरसच्या विळख्यात जगातील अनेक देश अडकले आहेत. आतापर्यंत कोरोनामुळे जगभरात जवळपास 50 हजार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी जगातील अनेक देशांनी लॉकडाउन केलं आहे. दरम्यान, अमेरिकेत झालेल्या एका संशोधनात कोरोनाला रोखायचं असेल तर किमान 6 आठवड्यासाठी लॉकडाउन गरजेचं आहे. संशोधकांनी लोकसंख्या हा यातला महत्त्वाचा मुद्दा असल्याचं म्हटलं आहे. कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी किमान 6 आठवडे लागतील. याकाळात लोकांनी त्यांच्या घरातच राहणं गरजेचं आहे. अमेरिकेत झालेल्या या संशोधनात म्हटलं आहे की, ज्या देशांनी सुरुवातीलाच या रोगाशी दोन हात केले तिथं प्रादुर्भाव कमी वेगाने झाला. या देशांमध्ये तीन आठवड्यात कोरोनाचं पुढचं रुप बघायला मिळालं. तर एक महिन्याच्या आता त्याला पसरण्यापासून रोखता आलं आणि 54 दिवसांमध्ये त्याचं संक्रमण थांबलं. संशोधकांनी म्हटलं की, या देशांनी लॉकडाउनचं कठोरपणे पालन केलं. लोकांना त्यांच्या घरांमध्ये राहण्यास सांगितलं आणि लोकांमध्ये संसर्ग झालेल्यांची तपासणी करून त्यांना क्वारंटाइन केलं. ज्या देशात हलगर्जीपणा झाला तिथं संक्रमण थांबवण्यासाठी बराच वेळ लागला. युनिव्हर्सिटी ऑफ साउदर्न कॅलिफोर्नियातील गेरार्ड टेलीस आणि रिवरसाइड युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाचे आशिष सूद यांनी हे संशोधन केलं. याशिवाय आणखी एका विद्यार्थ्याचा या संशोधनामध्ये सहभाग आहे. संशोधकांनी जवळपास 35 देशांचा अभ्यास केला. यामध्ये अमेरिकेतील 50 राज्यांचाही समावेश आहे. हे वाचा : खरं की खोटं : प्रखर सूर्यप्रकाश आणि UV किरणं कोरोनाला नष्ट शकतात का? टेलीस यांनी म्हटलं की, कोरोनाच्या संक्रमणामध्ये देशाची लोकसंख्या, त्याच्या सीमा, तिथली संस्कृती, भौगोलिक वातावऱण आणि रोगप्रतिकार शक्ती यांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. संशोधनामध्ये इटली आणि कॅलिफोर्नियात कडक लॉकडाउन तर साउथ कोरिया आणि सिंगापूर इथं मोठ्या प्रमाणावर झालेल्या संक्रमणाच्या अभ्यासाचाही समावेश आहे. सिंगापूर आणि साउथ कोरियाने संक्रमणाची चाचणी केली आणि लोकांना क्वारंटाइन केलं.याशिवाय लॉकडाउनही कडक केला आणि लोकांना घरातच राहण्याचे आदेश दिले. या सर्वांचा सकारात्मक परिणाम झाला. हे वाचा : ‘घराबाहेर पडल्यास कपाळावर शिक्का, 60 दिवस जाणार नाही शाई’ PHOTO VIRAL अमेरिकेचं प्रकरणच यामध्ये वेगळं ठरलं आहे. अमेरिकेतील अर्ध्या राज्यांनी कोरोनाशी गांभीर्याने लढा दिला तर काही ठिकाणी तत्परता दाखवण्यात कमी पडले. गेल्या महिन्यात अमेरिकेत फक्त एक हजार प्रकरणं होती. आता दिवसाला हा आकडा कित्येक हजारांच्या संख्येत आहे. सर्वाधिक फटका न्यूयॉर्कला बसला आहे. हे वाचा : अमेरिकेत कोरोनाचा कहर, 2 आठवड्यात 1 कोटी लोक झाले बेरोजगार
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.