Home /News /viral /

'LockDown मध्ये घराबाहेर पडल्यास कपाळावर शिक्का, 60 दिवस जाणार नाही शाई' PHOTO VIRAL

'LockDown मध्ये घराबाहेर पडल्यास कपाळावर शिक्का, 60 दिवस जाणार नाही शाई' PHOTO VIRAL

लॉकडाउनमध्ये घराबाहेर पडलात तर कपाळावर मतदानावेळी वापरण्यात येणाऱ्या शाईने शिक्का मारला जाईल असं सांगणारा मेसेज व्हायरल होत आहे.

  मुंबई, 28 मार्च : कोरोनामुळे जगभर दहशत निर्माण झाली आहे. चीननंतर इटलीत कोरोनाच्या बळींची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. दररोज 800 ते 1000 लोकांचा मृत्यू गेल्या काही दिवसांत इटलीमध्ये होत आहे. त्याशिवाय इराणसारख्या देशांमध्येही कोरोनाने हाहाकार उडाला आहे. तर भारतात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून 21 दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा केली आहे. या लॉकडाउनमध्ये लोकांना घरातून बाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली आहे. 14 एप्रिलपर्यंत हे लॉकडाउन असणार आहे. परदेशातून येणाऱ्या लोकांना तसंच कोरोना व्हायरस पसरलेल्या शहरांमधून गावाकडे येणाऱ्यांना होम क्वारंटाइन केलं जात आहे. त्यासाठी त्यांच्या हातावर एक शिक्काही मारला जात आहे. या लोकांना 14 दिवस घराबाहेर पडता येत नाही. त्यांना स्वतंत्र रहावं लागतं. या शिक्क्याचीही लोकांनी धास्ती घेतली आहे. त्यातच आणखी एका शिक्क्याचा व्हायरल मेसेज सोशल मीडियावर फिरत आहे. घराबाहेर पडणाऱ्या लोकांना पोलिसांनी लाठीचा प्रसादही दिला आहे. काही ठिकाणी नागरिकांना फुल देऊन, गाणी म्हणूनही पोलिसांनी विनंती केली आहे. आता जर घराबाहेर पडलात तर कपाळावर शिक्का मारला जाईल असं सांगणारा मेसेज व्हायरल होत आहे.
  काय आहे व्हायरल मेसेज? उद्या पासून हा शिक्का कपाळावर मारला जाणार आहे, या मध्ये इलेक्शन(मतदान झाल्यावर जी बोटा) ला जी शाई वापरली जाते ती वापरणार आहे कमीत कमी 60 दिवस तो शिक्का कपाळा वरून जाणार नाही.. घरी बसा.. स्वतःची आणि कुटुंबाची काळीज घ्या विनाकारण घराबाहेर जाऊ नका शासकीय यंत्रनेला सपोर्ट करा.🙏
  व्हायरल मेसेजबाबत किंवा संबंधित मेसेजसोबत पाठवला जाणारा शिक्क्याचा फोटो नीट पाहिला तर दिसून येतं की तो सरळ अक्षरात आहे. कोणताही शिक्का हा उलट असतो. त्यामुळे हा एडिटेड फोटो असून असा कोणताच शिक्का नाही. असा शिक्का नसला तरी नागरिकांनी घराबाहेर पडून स्वत:चा जीव धोक्यात घालू नये. हे वाचा : कोरोनाबाधितांवर होणार कॅशलेस उपचार, राज्य सरकारने केली मोठी घोषणा
  Published by:Suraj Yadav
  First published:

  Tags: Coronavirus

  पुढील बातम्या