भारतीय मुलीची चॉइस NASA ला आवडली, पहिल्या मार्स हेलिकॉप्टरला दिलं हे नाव

भारतीय मुलीची चॉइस NASA ला आवडली, पहिल्या मार्स हेलिकॉप्टरला दिलं हे नाव

भारतीय वंशाच्या मुलीने लिहिलेल्या निबंधावरून नासाने त्यांच्या पहिल्या मार्स हेलिकॉप्टरला नाव दिलं आहे.

  • Share this:

वॉशिंग्टन, 30 एप्रिल : अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासाच्या पहिल्या मार्स हेलिकॉप्टरचं नाव ठेवण्यात आलं आहे. हे नाव ठेवण्याचं श्रेय भारतीय वंशाची वनीजा रुपाणी या 17 वर्षांच्या मुलीला देण्यात आलं आहे. वनीजा रुपाणी अल्बामातील नॉर्थपोर्ट इथं एका हायस्कूलमध्ये शिकते. तिने नासाच्या नेम द रोव्हर कंटेस्टमध्ये भाग घेतला होता. त्यात हेलिकॉप्टरच्या नावावर निबंध वनिजाने लिहिला होता.

वनिजाच्या सल्ल्यानंतर नासाच्या या मार्स हेलिकॉप्टरला अधिकृतपणे इंजिन्यूटी असं नाव देण्यात आलं आहे. दुसऱ्या ग्रहांवर उड्डाण करणारं हे पहिलं विमान असेल. नासाने मार्च महिन्यात घोषणा केली होती की, ते दुसऱ्या रोव्हरचं नाव परसवरन्स असं ठेवणार आहेत. या रोव्हरचं नाव सातवीत शिकणाऱ्या मुलाच्या निबंधावर आधारित ठेवलं होतं. यानंतर एजन्सीनं मार्स हेलिकॉप्टरचं नावही निबंधाच्या आधारावर ठेवण्याचा निर्णय घेतला होता.

नासाने ट्विट करताना म्हटलं की, आमच्या मार्स हेलिकॉप्टरचं नाव इंजिन्यूटी आहे. वनिजा रुपाणी हिने नेम द रोव्हर स्पर्धेत भाग घेतला होता. इंजिन्यूटी मार्सवर @NASAPerservere सोबत जाईल आणि दुसऱ्या ग्रहावर जाऊन उड्डाण करेल.

हे वाचा : बाळ आजारी आहे म्हणत दवाखान्यात निघालं होतं दाम्पत्य, पोलिसांनी चेक केलं तर...

वनिजा 28 हजार विद्यार्थ्यांपैकी एक होती. अमेरिकेतील प्रत्येक राज्यातून आणि भागातून निबंध पाठवण्यात आले होते. यानंतर नासाने बुधवारी मार्स हेलिकॉप्टरच्या नावाची घोषणा केली होती. नासाने म्हटलं की, वनिजाने तिच्या निबंधात लिहिलं की, इंजिन्यूटी आणि कष्ट करणाऱ्या लोकांच्या समजुतदारपणामुळेच अंतराळ प्रवासातील आव्हाने पार करता येता आणि अंतराळातील चमत्कारांचा अनुभव घेता येतो. इंजिन्यूटी ती आहे ज्याच्या मदतीने आपण आश्चर्यकारक वस्तुंचा अनुभव घेतो. ब्रह्मांडाच्या किनाऱ्यापर्यंत पोहोचता येतं.'

हे वाचा : अमेरिकेनं कोरोनाला कधीच हरवलं असतं, 14 वर्षांपूर्वीचं 'शटअप' पडलं महागात

संपादन - सूरज यादव

 

First published: April 30, 2020, 8:29 PM IST
Tags: nasa

ताज्या बातम्या