न्यूयॉर्क, 30 एप्रिल : जगभर कोरोनाने हाहाकार माजवला आहे. या हाहाकारात सर्वाधिक दणका बसला तो अमेरिकेला. कोरोनामुळे अमेरिकेत मृतांचा आकडा आतापर्यंत 60 हजारांच्यावर पोहोचला आहे. दरम्यान आता एक धक्कादायक अशी माहिती समोर येत आहे. अमेरिकेत 14 वर्षांपूर्वी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या सोशल डिस्टंन्सिंगच्या कायद्याचा प्रस्ताव फेटाळून लावला नसता तर इतकं प्रचंड नुकसान झालं नसतं.
अमेरिकेतील दोन वरिष्ठ सरकारी डॉक्टर रिचर्ड आणि कार्टर यांनी असा दावा केला आहे. डॉक्टर रिचर्ड सध्या कॅन्सर तज्ञ सल्लागार म्हणून व्हाइट हाऊसमध्ये कार्यरत आहेत. तर कार्टर हे वेटरन्स अफेअर्स विभागात सेवा करतात. या दोघांनीही न्यू यॉर्क टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सोशल डिस्टन्सिंगच्या प्रस्तावाबद्दल आणि तो फेटाळल्याच्या घटनेची माहिती दिली.
डॉक्टर कार्टर यांनी सांगितलं की, रिचर्ड यांच्यासोबत सोशल डिस्टन्सिंगच्या प्रस्तावाची अंतिम तयारी 14 वर्षांपूर्वी केली होती. त्यामध्ये असं निश्चित करण्यात येत होतं की जर अमेरिकेत एखादी साथ आली तर लोकांनी सोशल डिस्टन्सिंग कसं पाळावं? आणि घरातून काम कसं करता येईल? मात्र जेव्हा हा प्रस्ताव मांडला तेव्हा त्याची खिल्ली उडवण्यात आली. तसंच मेडिकल उद्योगाच्या बाजूनं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मत मांडलं. घरात बसण्यापेक्षा चांगले उपचार आणि औषधे शोधण्यावर भर द्यावा असं सांगण्यात आलं.
कोरोना व्हायरस जगासाठी पूर्णपणे नवीन आहे. याचा स्रोत, यावर उपचार याची काहीही माहिती कोणाकडेच नाही. याला रोखण्यासाठी एकच उपचार आहे तो म्हणजे सोशल डिस्टन्सिंग. डॉक्टर रिचर्ड म्हणातात की, ज्या देशांमध्ये कोरोनाला नियंत्रणात ठेवलं तिथं सोशल डिस्टन्सिंगचा वापर कऱण्यात आला. यामध्ये जीव जाण्याचं प्रमाण कमी असतं. मी आणि कार्टर दोघांनी मिळून 2006 - 07 मध्ये अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांच्या पुढाकाराने प्रस्ताव ठेवला होता. संसर्गजन्य आजाराशी सामना करण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगशिवाय दुसरा पर्याय असू शकत नाही. मात्र तेव्हा नोकरशहांनी हे व्यवहारात बसत नसून अनावश्यक असल्याचं म्हटलं होतं.
हे वाचा : किम जोंग उननंतर कोण? उत्तर कोरियात 'कहानी में ट्विस्ट'; सत्तासंघर्ष अटळ
इनफ्लुएंझाचा प्रकोप आणि टेमीफ्लू च्या औषधाचा उपयोग न झाल्यानं साथीच्या आजाराशी लढायला अजुन काही पर्याय आहेत का याचा शोध घेण्यात डॉक्टर रिचर्ड आणि कार्टर गुंतले होते. त्यावेळी एका मित्राशी चर्चा करताना त्यांना सोशल डिस्टन्सिंगची कल्पना सुचली. मित्राची मुलगी सोशल नेटवर्कचा प्रोजेक्ट करत होती. त्यानुसार शाळेतली मुलं समाजात वावरताना, स्कूल बसमध्ये आणि वर्गात एकमेकांशी इतके जोडले जातात, संपर्कात येतात की साथीच्या रोगावेळी ते याचा वाहकच बनू शकतात.
हे वाचा : 'चीन नव्हे अमेरिकेत आहे कोरोनाचा पेशंट झीरो', चीनच्या दाव्यात किती तथ्य?
एका शाळेत शिकणाऱ्या मुलीच्या प्रोजेक्टवरून सोशल डिस्टन्सिंगचा मार्ग अवलंबल्यास किती फरक पडू शकतो याचा विचार डॉक्टर कार्टनर यांनी केला. त्यानुसार 10 हजार लोकसंख्येच्या शहरात फक्त शाळा बंद केल्या तर 500 पर्यंत लोकांना लागण होऊ शकते. तर शाळा सुरु ठेवल्यास अर्धं शहर साथीला बळी पडू शकतं असा धक्कादायक अभ्यास समोर आला.त्यानंतर सोशल डिस्टन्सिंगवर चर्चा करून त्याचा प्रस्ताव तयार करण्यात आल्याची माहिती डॉक्टर रिचर्ड आणि डॉक्टर कार्टर यांनी दिली.
हे वाचा : Coronavirus 'चीनी' व्हायरस आहे? चीननं दिलं असं उत्तर
अमेरिकेत 2005 मध्ये सोशल डिस्टन्सिंगवर चर्चा सुरु झाली. त्यात जॉर्ज बुश यांनी पुढाकार घेतला. 2001 मध्ये अमेरिकेवर दहशतवादी हल्ल्यानंतर बुश यांनी द ग्रेट इनफ्लुंएझा पुस्तक वाचलं. जे 1918 च्या स्पॅनिश फ्लूवर आधारीत होतं. त्या वर्षी व्हिएतनाममध्ये बर्ड फ्लूसह अनेक संसर्गजन्य आजारांमुळे त्यांची शंका वाढली.
बुश यांची इच्छा होती की कोणत्याही साथीच्या रोगापासून वाचण्यासाठी ठोस उपाय हवेत. त्यावेळी बुश यांनी सविस्तर चर्चाही केली होती आणि सोशल डिस्टन्सिंगला प्रोत्साहन दिलं होतं. बराक ओबामा यांच्या सरकारने पाच वर्षं याची समीक्षा केल्यानंतर 2017 मध्ये याचे डॉक्युमेंटेशन केलं. मात्र डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने याकडे लक्ष दिलं नसल्याचं डॉक्टर रिचर्ड यांनी म्हटलं.
हे वाचा : लॉकडाऊनमुळे 200 किमी अंतरावरून दिसतंय विलोभनीय दृश्य, पाहा PHOTO
ट्रम्प यांनी कोरोनाचा धोका असतानाही अनेक बाबींकडे दुर्लक्ष केलं. त्याचे परिणाम दिसायला लागताच आणि मृतांचा आकडा वाढल्यानंतर राज्यांमध्ये लॉकडाऊन करण्यात आलं. 14 वर्षांपूर्वी आम्हाला 'शटअप' म्हटले नसते तर आज अमेरिकेत सोशल डिस्टन्सिंग फेडरल पॉलिसी असती. त्यामुळे आता झालेलं नुकसान टाळता आलं असतं असं डॉक्टर रिचर्ड आणि डॉक्टर कार्टर यांनी म्हटलं.
हे वाचा : स्पेनमध्ये लॉकडाऊन शिथिल, मृत्यूच्या तांडवानंतर स्पेनमधील काही आनंदी PHOTOS
संकलन, संपादन - सूरज यादव