विशाखापट्टणम, 30 एप्रिल : कोरोनाला रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन कऱण्यात आलं आहे. मात्र या लॉकडाऊनमध्येही काही लोक नियम मोडूल घरातून बाहेर पडत आहेत. या लोकांना पोलीसांचा प्रसादही मिळतो. तरीही हे लोक घरात बसायला तयार नाहीत. आंध्र प्रदेशात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशाखापट्टणम इथं वैद्यकीय कारण देत बाहेर पडलेल्या एका दाम्पत्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. गोपालपट्टनम इथून एका मुलाला घेऊन आलेल्या एका दाम्पत्याला बुधवारी एनएडी जंक्शनवर अडवण्यात आलं. त्या दाम्पत्यानं पोलिसांना सांगितलं की, त्यांना मुलाला रुग्णालयात घेऊन जायचं आहे. तेव्हा पोलिसांनी दाम्पत्याला जाण्यास परवानगी दिली. मात्र एका कॉन्स्टेबलला संशय आला आणि त्याने चेक केलं. मुलाला दवाखान्यात घेऊन जाणाऱ्या दाम्पत्याकडे कॉन्स्टेबलनं चौकशी केली. त्यानंतर मुलाची तब्येत कशी आहे तपासण्यासाठी थांबवलं. जेव्हा त्या बाळाला बघण्यासाठी कॉन्स्टेबल गेला तेव्हा ते बाळ नसून एक बाहुली असल्याचं आढळलं. हे वाचा : लॉकडाउनमध्ये रेल्वे बंद, पण IRCTC प्रवाशांच्या खिश्यातून केली बक्कळ कमाई! लॉकडाऊनच्या काळात नियम तोडल्याबद्दल संबंधित दाम्पत्यावर कारवाई कऱण्यासाठी त्यांच्याकडं माहिती मागितली. तेव्हा एका वृद्ध नातेवाईकाला पाहण्यासाठी जात असल्याचं त्यांनी सांगितलं. पोलिसांनी त्यांना इशारा देऊन सोडून दिलं. मात्र लोक घरातून बाहेर पडण्यासाठी असंही काही करू शकतात हे पाहून पोलिसांनाही आश्चर्य वाटलं. हे वाचा : अमेरिकेनं कोरोनाला कधीच हरवलं असतं, 14 वर्षांपूर्वीचं ‘शटअप’ पडलं महागात संपादन - सूरज यादव
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.