नवी दिल्ली, 27 सप्टेंबर : अमेरिकन अंतराळ संस्था नासानं इतिहास रचला आहे. पृथ्वीला लघुग्रहाच्या धोक्यापासून वाचवण्याच्या अभ्यासाअंतर्गत नासानं डार्ट मिशन हाती घेतलं होतं. लघुग्रहाला धडक देऊन त्याची दिशा बदलण्याचं काम या मोहिमेअंतर्गत करण्यात येणार होतं. ही मोहीम सफल झाली आहे. त्यामुळे भविष्यात अशाप्रकारचं कोणतंही संकट पृथ्वीवर आल्यास त्याचा मुकाबला यशस्वीरित्या करता येणार आहे.
दरम्यान हा अंतराळातील सर्वात मोठा प्रयोग माणला जात होता. पृथ्वीला लघुग्रहापासून वाचवण्यासाठी नासानं डार्ट मिशन हाती घेतलं होतं. अंतराळ यानानं डिमोफोर्स नावाच्या एका लघुग्रहाला धडकलं. हा लघुग्रह एका मोठ्या लघुग्रहाची परिक्रमा करत होता. डार्टला धडक देणाऱ्या लघुग्रहाची लांबी 169 मीटर इतकी होती. भविष्यात लघुग्रहामुळे पृथ्वीवर संकट ओढावू शकतं. अशा परिस्थितीत पृथ्वीला वाचवण्यासाठी आता यशस्वी झालेल्या मिशन डार्ट कामी येऊ शकतं.
IMPACT SUCCESS! Watch from #DARTMIssion’s DRACO Camera, as the vending machine-sized spacecraft successfully collides with asteroid Dimorphos, which is the size of a football stadium and poses no threat to Earth. pic.twitter.com/7bXipPkjWD
— NASA (@NASA) September 26, 2022
हे ही वाचा : #कायद्याचंबोला: बँकेचा वसुली एजंट धमकावतोय? गाडी उचललीय? नातेवाईकंना फोन? असा शिकवा धडा
डार्ट मिशनची टक्कर Didymos लघुग्रहाच्या चंद्र Dimorphos शी झाली. जर डिमॉर्फोसने आपली दिशा आणि कक्षा बदलली तर भविष्यात पृथ्वीवर अवकाशातून आपल्या दिशेने येणारा असा कोणताही धोका परतवू शकेल. डार्ट मिशनचे अंतराळयान ताशी 22,530 किलोमीटर वेगाने डिमॉर्फोसला धडकले. टक्कर होण्यापूर्वी, डार्ट मिशनने डिमॉर्फोस आणि लघुग्रह डिडिमॉसचे वातावरण, माती, दगड आणि रचना यांचा देखील अभ्यास केला होता. या मोहिमेत कायनेटिक इम्पॅक्टर तंत्राचा वापर करण्यात आला.
वास्तविक, नासाला प्रोजेक्ट डार्टच्या माध्यमातून हे पाहायचे होते की, लघुग्रहावर अवकाशयानाच्या टक्करचा काही परिणाम होतो की नाही? अंतराळयानाच्या टक्करमुळे लघुग्रहाच्या दिशेवर आणि वेगावर परिणाम होतो की नाही? याचा सविस्तर अहवाल पुढच्या काही काळात आल्यानंतरच या प्रश्नांची उत्तरे मिळण्याची शक्यता आहे. पण नासाच्या शास्त्रज्ञांना खात्री आहे की अंतराळयानाच्या टक्करेमुळे डिमॉर्फोसवर नक्कीच परिणाम झाला आहे.
हे ही वाचा : वटवाघळांमध्ये आढळला कोरोनासारखाच खोस्टा-2 व्हायरस; माणसांसाठीही घातक? लसही नाही प्रभावी
टक्कर होण्यापूर्वी, डिमॉर्फोसला 780 मीटर रुंद लघुग्रहाची परिक्रमा करण्यासाठी 11 तास 55 मिनिटे लागली. या टक्कर नंतर ही वेळ थोडी कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ताशी 22 हजार किलोमीटर वेगाने धावणाऱ्या डार्ट प्रोबला एका मोठ्या खडकापासून लहान खडक वेगळे करावे लागले. अंतराळयानावरील नेव्हिगेशन सॉफ्टवेअरने नंतर एक-एक टक्कर सुनिश्चित करण्यासाठी थ्रस्टर उडवले.
डिमॉर्फोसच्या आकाराएवढी कोणतीही वस्तू पृथ्वीवर पडली तर सुमारे एक किलोमीटरच्या वर्तुळात 100 मीटर खोल खड्डा असू शकतो. यामुळे होणारे नुकसान खूप भयानक असेल. त्यामुळे अवकाशात असलेल्या अशा खडकांचा नाश करता येईल का, त्यांचा मार्ग बदलता येईल का, याच्या शोधात शास्त्रज्ञ सतत असतात. दरम्यान यातून नासाला यश आले आहे.