मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

वटवाघळांमध्ये आढळला कोरोनासारखाच खोस्टा-2 व्हायरस; माणसांसाठीही घातक? लसही नाही प्रभावी

वटवाघळांमध्ये आढळला कोरोनासारखाच खोस्टा-2 व्हायरस; माणसांसाठीही घातक? लसही नाही प्रभावी

एका मीडिया रिपोर्टनुसार, संशोधकांना रशियन वटवाघळांमध्ये विषाणू (Sars-Cov-2 Virus) सापडला आहे. ज्यामुळे मानवांसाठीही समस्या निर्माण होऊ शकतात.

एका मीडिया रिपोर्टनुसार, संशोधकांना रशियन वटवाघळांमध्ये विषाणू (Sars-Cov-2 Virus) सापडला आहे. ज्यामुळे मानवांसाठीही समस्या निर्माण होऊ शकतात.

एका मीडिया रिपोर्टनुसार, संशोधकांना रशियन वटवाघळांमध्ये विषाणू (Sars-Cov-2 Virus) सापडला आहे. ज्यामुळे मानवांसाठीही समस्या निर्माण होऊ शकतात.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 24 सप्टेंबर : एकेकाळी कोरोनाचं नाव ऐकूनच माणसं एकमेकांपासून दूर पळायची. या साथीच्या रोगाने अशी दहशत निर्माण केली की संपूर्ण जगाला धडा शिकवला. चीनमधून पसरलेला कोरोना हे अजूनही एक रहस्यच आहे की खरोखरच याचा प्रसार चीनमधून झाला की अन्य कुठून, याबद्दल अद्याप कोणतीही वैज्ञानिक माहिती देण्यात आलेली नाही. अमेरिका चीनवर सतत आरोप करत होती, पण अमेरिकेसारख्या बलाढ्य देशालाही आपल्या आधुनिक तंत्रज्ञानाने कोरोनाचं घर कुठे आहे हे शोधता आलं नाही. या कोरोनाबाबत आता एक नवीन संशोधन समोर आलं आहे.

Taiwan Earthquake : तैवान हादरलं! 2 दिवसांत 100 पेक्षा अधिक धक्के; भूकंपाची भीषणता दाखवणारे 5 VIDEO

एका मीडिया रिपोर्टनुसार, संशोधकांना रशियन वटवाघुळांमध्ये विषाणू सापडला आहे. ज्यामुळे मानवांसाठीही समस्या निर्माण होऊ शकतात. या विषाणूचे वर्णन SARS-CoV-2 असं केलं जात आहे. यात इतकी क्षमता आहे की ती मानवी शरीरालाही संक्रमित करू शकतो. महत्त्वाचं म्हणजे सध्या जे लसीकरण केले जात आहे, ते या विषाणूला रोखण्यासाठी प्रभावी ठरणार नाही.

PLOS Pathagons या जर्नलमध्ये गुरुवारी प्रकाशित झालेल्या एका शोधपत्रात या विषाणूचं नाव खोस्ता-2 असं आहे. हे कोरोनाव्हायरसच्या सब कॅटेगिरीच्या श्रेणीमध्ये येतं, ज्याला सर्बेकोव्हायरस असंही म्हणतात. हे SARS-CoV-2 चा एक प्रकार असल्याचं सांगितलं जात आहे. 2020 च्या शेवटी, अमेरिकेतील वॉशिंग्टन स्टेट युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी रशियन वटवाघळांमध्ये विषाणू शोधला होता.

काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं, नेपाळच्या भूस्खलनात 13 जणांनी गमावला जीव

टीमला दोन नवीन व्हायरस सापडले आहेत. ज्यांची नावे खोस्ता-1 आणि खोस्ता-2 अशी ठेवण्यात आली आहेत. तपासादरम्यान असं आढळून आलं की खोस्ता-1 हा मानवासाठी जास्त घातक नाही, तर खोस्ता-2 मानवी शरीरासाठी धोकादायक असल्याचं सिद्ध होऊ शकतं. टीमने सांगितलं की, सुरुवातीच्या टप्प्यात असं वाटलं होतं, की हा विषाणू धोकादायक नाही, परंतु जेव्हा या विषाणूचे बारकाईने निरीक्षण केलं तेव्हा असं आढळून आलं की हा विषाणू मानवांना संक्रमित करू शकतो.

कोरोना विषाणू अद्याप जगातून संपलेला नाही. डब्ल्यूएचओच्या कोरोनाव्हायरस डेटानुसार, 22 सप्टेंबर रोजी जगभरात 1,395 रुग्णांचा मृत्यू झाला. तर संसर्गाची 4,28,321 नवीन प्रकरणे नोंदवली गेली, जी ऑक्टोबर 2020 नंतरची सर्वात कमी प्रकरणं होती. 26 जानेवारी 2022 रोजी कोरोनाची सर्वाधिक प्रकरणं (4,040,309) नोंदवली गेली होती. 21 जुलै 2021 रोजी कोविडमुळे सर्वाधिक मृत्यू (20,005) झाले होते.

First published:

Tags: Corona, Virus