मराठी बातम्या /बातम्या /विदेश /Explainer : म्यानमारमध्ये लष्करी हुकूमशाहीला कसं घाबरवतंय महिलांचं पारंपरिक वस्त्र?

Explainer : म्यानमारमध्ये लष्करी हुकूमशाहीला कसं घाबरवतंय महिलांचं पारंपरिक वस्त्र?

म्यानमारमध्ये लोकशाही मार्गानं निवडून आलेलं सरकार लष्करानं उलथवून टाकत सत्ता ताब्यात घेतली. सत्तेत आलेल्या लष्करानं म्यानमारच्या नेत्या आँग सान सू की (Aung San Suu Kyi) यांच्यासह अनेक नेत्यांना अटक केली

म्यानमारमध्ये लोकशाही मार्गानं निवडून आलेलं सरकार लष्करानं उलथवून टाकत सत्ता ताब्यात घेतली. सत्तेत आलेल्या लष्करानं म्यानमारच्या नेत्या आँग सान सू की (Aung San Suu Kyi) यांच्यासह अनेक नेत्यांना अटक केली

म्यानमारमध्ये लोकशाही मार्गानं निवडून आलेलं सरकार लष्करानं उलथवून टाकत सत्ता ताब्यात घेतली. सत्तेत आलेल्या लष्करानं म्यानमारच्या नेत्या आँग सान सू की (Aung San Suu Kyi) यांच्यासह अनेक नेत्यांना अटक केली

    यांगून (म्यानमार), 17 मार्च :  म्यानमारमध्ये जानेवारी 2021 च्या उत्तरार्धात अनेक घडामोडी (Myanmar Violence) घडल्या. लोकशाही मार्गानं निवडून आलेलं सरकार लष्करानं उलथवून टाकत सत्ता ताब्यात (Myanmar Military Takeover) घेतली. सत्तेत आलेल्या लष्करानं म्यानमारच्या नेत्या आँग सान सू (Aung San Suu) यांच्यासह अनेक नेत्यांना अटक केली. सत्तापालटाच्या या अनपेक्षित आणि अचानक घडलेल्या घटनेनंतर म्यानमारमधील जनता लष्कराच्याविरोधात आक्रमक होत रस्त्यावर उतरली आहे. म्यानमारमधील जनता आणि लष्कर आमने-सामने आले आहे. याच दरम्यान एक नवा ट्रेंड पाहायला मिळत आहे. म्यानमारच्या महिलांचे एक खास वस्त्र शहराच्या वेगवेगळ्या ठिकाणी लटकवलेले पहायाला मिळत आहे. सारोंग नावाच्या या वस्त्रामुळे लष्करामध्ये भीतीचं वातावरण आहे.

    म्यानमारमध्ये अखेर अरब क्रांतीसारखी परिस्थिती का निर्माण झाली आहे हे जाणून घेण्यासाठी तणावाचं नेमकं कारण समजून घेणं गरजेचं आहे. या देशात आधीपासूनच लष्कराची सत्ता राहिली आहे. आँग सान सू राजकारणात आल्यानंतर परिस्थितीत बदलली. 2020मध्ये आँग सान सू यांचा पक्ष नॅशनल लीग फॉर डेमोक्रेसीनं (NLD) प्रचंड बहुमतानं विजय मिळवला. आँग सान सू यांची लोकप्रियता हे यामागचं कारण असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, निवडणुकीत प्रचंड घोळ झाल्यामुळेच त्यांच्या पक्षाचा विजय झाला असल्याचा संशय लष्कराने व्यक्त केला होता.

    लष्करानं याप्रकरणी चौकशीची मागणी केली. परंतू नव्यानं सत्तेमध्ये आलेल्या सरकारनं त्यांची ही मागणी पूर्ण करण्यास नकार देत काम सुरु केलं. त्यानंतर 1 फेब्रुवारीला लष्करानं नवनिर्वाचित खासदारांची बैठक रोखण्याचा प्रयत्न करत नेत्यांना अटक केली. 2011च्या पूर्वी या देशावर लष्कराचाच ताबा होता. म्हणजे लोकशाहीऐवजी या ठिकाणी लष्कराची सत्ता होती. आता सत्तापालटानंतर म्यानमारचं सरकार लष्करप्रमुख मिन आंग लाइंग यांच्या हातात आलं आहे.

    म्यानमारमधील जनता लष्करी सत्तेला विरोध करत रस्त्यावर उतरली आहे. एवढंच नाही तर लष्करी सरकार त्यांच्यावर दबाव टाकण्यासाठी हिंसाचाराचा अवलंब करत आहे. याच घडामोडीमध्ये एक नवीन गोष्ट पाहायला मिळत आहे. म्यानमारमधील महिला आधीपासूनच लष्करी सरकारचा निषेध करत आहे. पण आता त्या लष्करामधील अंधविश्वासाचा आधार घेत त्यांना घाबरवण्याचा प्रयत्न करत आहेत. याअंतर्गत त्या सारोंग नावाची वस्त्र शहरात ठिकठिकाणी लटकवत आहेत.

    सारोंग हे महिलांच्या कमरेवर घातले जाणारे वस्त्र (women clothes sarong) आहे. म्यानमारमध्ये असा समज आहे की, जर एखादा पुरुष या वस्त्राखाली गेला तर त्याचे पौरुषत्व संपते आणि तो नपुंसक होतो. म्यानमारमध्ये या गोष्टीवर खूप विश्वास ठेवला जातो. म्हणून म्यानमारमधील महिला या वस्त्राचा वापर शस्त्र म्हणून करत आहेत. या महिला शहराच्या रहिवासी भागामध्ये झेंड्याप्रमाणे ही सारोंग नावाची वस्त्र लटकवत आहेत जेणेकरुन लष्कर त्याठिकाणी जाऊ नये.

    VIDEO: कर्जबाजारी पाकिस्तानात आकाशातून नोटांचा पाऊस; पैशांसाठी लोकांची झुंबड

    म्यानमारमध्ये याला आता सारोंग क्रांती म्हटलं जात आहे. याचा परिणाम देखील पाहायला मिळत आहे. मर्दानी शक्ती गमावण्याच्या भीतीने लष्कराचे जवान या भागामध्ये प्रवेश करत नाहीत. तसंच ठिकठिकाणी लटकवलेली सारोंग ते आधी काढून टाकतात आणि नंतर प्रवेश करतात. त्यामुळे आंदोलकांना त्याठिकाणावरुन हलण्यासाठी खूप वेळ मिळत आहे. आंदोलनाच्या वेळी महिलांनी सारोंग वस्त्रापासून बॅरिकेट्स तयार केले आहे जेणेकरुन लष्कराचे जवान घाबरतील.

    पाकिस्तानात ज्यांच्या समाधीस्थळाची तोडफोड झाली ते स्वामी अद्वैतानंद कोण?

    म्यानमारमध्ये सारोंगचा इतिहास खूप जुना आहे. छातीपासून कमरेपर्यंत गुंडाळलेले हे वस्त्र स्थानिक नागरिकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. सारोंग हा इंग्रजीसह अनेक भाषांमध्ये अपमानजनक शब्द आहे. ज्याचा अर्थ झाकण्यासाठी असा होतो. 1834 मध्ये पहिल्यांदा या शब्दाचा वापर करण्यात आला होता. जवळपास 1 मीटर रुंद आणि अडीच मीटर लांबीचे हे वस्त्र त्यावेळी महिलांसोबत पुरुष देखील परिधान करायचे. पण नंतर हळूहळू हे वस्त्र महिलांपूरतेच मर्यादित राहिले. या वस्त्रामध्ये स्त्रीलिंगी गुणधर्म असल्याचं मानलं जाऊ लागलं तेव्हापासून असा समज आहे की, जर पुरुष सारोंगच्या खाली झाकला गेला तर त्याचं पौरुषत्व संपते.

    (हे वाचा:  112 किलो वजनाच्या क्रिकेटपटूवरून पाकिस्तानमध्ये 'वॉर', टीममध्ये पडले दोन गट)

    दुसरीकडे, म्यानमारमध्ये पौरुषत्वासाठी एक खास शब्द आहे ज्याला हपोन असं म्हणतात. असा समज आहे की, सारोंगच्या संपर्कात आल्यानं हपोन म्हणजे पौरुषत्व संपते. तर आता म्यानमारमधील बर्मीज महिला याच अंधविश्वासाचा आधार घेत लष्कराला सीमेवर राहण्यास भाग पाडत आहेत. सारोंगकडे फक्त लैंगिक भेदभावाचं वस्त्र म्हणून पाहिलं जात नाही तर त्याला सौभाग्याचं प्रतीक म्हणून मानलं जातं. जसं पूर्वीच्या काळामध्ये युद्धामध्ये जाताना बर्मीज स्वत:सोबत आपली आई किंवा वयोवृद्ध महिलेच्या सारोंगचा तुकडा घेऊन जायचे. त्यांचा असा विश्वास होता की, या सारोंगचा तुकडा आशीर्वाद म्हणून त्यांचे संरक्षण करेल. आता हेच सारोंग लष्करी हुकूमशाहीविरुद्ध वापरलं जात आहे. संपूर्ण म्यानमारमध्ये सारोंग लटकवलेले पाहायला मिळत असून याला सारोंग क्रांती म्हटलं जात आहे.

    First published:

    Tags: India, Military, Myanmar