मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /112 किलो वजनाच्या क्रिकेटपटूवरून पाकिस्तानमध्ये 'वॉर', टीममध्ये पडले दोन गट

112 किलो वजनाच्या क्रिकेटपटूवरून पाकिस्तानमध्ये 'वॉर', टीममध्ये पडले दोन गट

पाकिस्तान टीमचा (Pakistan Cricket) कर्णधार बाबर आझमने (Babar Azam) टीम निवडीवर प्रश्न उपस्थित केले, यानंतर आता पाकिस्तानचा मुख्य प्रशिक्षक मिसबाह उल हकने (Misbah Ul Haq) देखील शरजील खान (Sharjeel Khan) च्या निवडीवर नाराजी व्यक्त केली आहे.

पुढे वाचा ...

लाहोर, 16 मार्च : पाकिस्तान क्रिकेट टीममध्ये (Pakistan Cricket) अनेक प्रतिभावान युवा खेळाडू येतात, पण तरीही टीमला चांगली कामगिरी करता येत नाही. याच एक कारण म्हणजे त्यांची टीम निवड असल्याचंही सांगितलं जातं. काहीच दिवसांपूर्वी झिम्बाब्वे आणि दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यासाठी पाकिस्तान टीमची निवड झाली, पण यावरून बराच वाद निर्माण झाला आहे. टीमचा कर्णधार बाबर आझमने (Babar Azam) टीम निवडीवर प्रश्न उपस्थित केले, यानंतर आता पाकिस्तानचा मुख्य प्रशिक्षक मिसबाह उल हकने (Misbah Ul Haq) देखील एका खेळाडूच्या निवडीवर नाराजी उघड केली आहे.

मिसबाह उल हक 112 किलो वजनाचा क्रिकेटपटू शरजील खानच्या (Sharjeel Khan) निवडीवर नाराज आहे. पाकिस्तानी माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसाार मिसबाह शरजील खानच्या फिटनेसवर समाधानी नाही, तर बाबर आझमचंही हेच मत आहे. या दोघांनाही टीममध्ये अनफिट खेळाडू नको आहेत, त्यामुळे शरजील खानला अंतिम-11 मध्ये संधी मिळणार नाही, असंच वाटत आहे.

एकीकडे प्रशिक्षक आणि कर्णधार या निवडीवर नाराज असले, तरी निवड समिती अध्यक्ष मोहम्मद वसीम यांनी मात्र वेगळंच मत मांडलं आहे. फक्त फिटनेस हा टीम निवडीचा निकश नाही. फिटनेससोबतच खेळाडूचा फॉर्मही महत्त्वाचा आहे, अशी प्रतिक्रिया वसीम यांनी दिली आहे.

शरजील खानने पाकिस्तान सुपर लीगमध्ये शानदार कामगिरी केली. कोरोनामुळे पीएसएल रद्द करण्याआधी शरजीलने 5 मॅचमध्ये 200 रन ठोकले होते, यात त्याचा स्ट्राईर रेट 170 पेक्षा जास्तचा होता. या कामगिरीमुळेच शरजीलची पाकिस्तानी टीममध्ये निवड झाली.

बाबर 6 खेळाडूंच्या फिटनेसवर नाराज

पाकिस्तानची टेस्ट टीम पीएसएलच्या कामगिरीवर निवडली गेल्याचं मत बाबर आझमने मांडलं आहे. बाबरला टीममध्ये यासीर शाह हवा होता, पण त्याला बाहेर बसवण्यात आलं. तसंच टी-20 टीममध्ये इमाद वसीमसारख्या ऑलराऊंडरला स्थान मिळालं नाही. बाबरला टीममध्ये अनुभवी आणि युवा खेळाडूंचं मिश्रण हवं होतं, पण पाकिस्तानी निवड समितीने त्याचं ऐकलं नाही. मला डमी कर्णधार बनण्यात रस नसल्याचा इशाराही बाबर आझमने दिला होता.

First published:
top videos

    Tags: Cricket, Pakistan