नवी दिल्ली, 6 एप्रिल: केवळ महाराष्ट्र आणि भारतातच नाही तर जगभरातील विविध देशांत पुन्हा एकदा कोरोनाने (coronavirus global pandemic) डोकं वर काढलं आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे (Coronavirus) विविध देशांतील सरकारने कठोर निर्बंध लावत कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी (Break the chain) उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. फिलिपीन्स (Philippines curfew news) मध्ये सुद्धा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता तेथील सरकारने संचारबंदी लागू केली आहे. तसेच संचारबंदीच्या नियमाचे (Covid-19 curfew) उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्यात येत आहे. अशाच प्रकारे एका व्यक्तीने संचारबंदीचं उल्लंघन (Punishment for curfew norms break) केल्याने त्याला अशी काही शिक्षा देण्यात आली ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे.
300 स्क्वॉट्सची शिक्षा
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, 28 वर्षीय डॅरेन नावाचा तरुण फिलिपिन्समधील मनिला येथील कॅवेट प्रांतातील एका दुकानात गुरुवारी पाणी विकत घेण्यासाठी गेला. सायंकाळी सहा वाजता तो पाणी घेण्यासाठी गेला होता. संचारबंदीच्या नियमांचे उल्लंघन केल्याने स्थानिक पोलिसांनी त्याला रोखले. डॅरेनचे नातेवाईक अॅड्रियन यांनी फेसबूकवर सांगितले की, डॅरेन आणि इतर नागरिकांना संचारबंदीच्या नियमांचे उल्लंघन केल्याने पकडले आणि त्यांना शिक्षा म्हमून 100 स्क्वॅट (squat) करण्यास सांगितले. डॅरेनचे नातेवाईक अॅड्रियन यांच्या मते, या सर्वांना स्क्वॅट एकसलग करण्यास सांगितले होते मात्र, तसे न करता आल्याने पोलिसांनी त्यांना पुन्हा-पुन्हा स्क्वॅट करण्यास सांगितले. डॅरेन आणि इतरांनी 300 स्क्वॅट्स केले.
वाचा - पुणे तिथे काय उणे! लस घ्या आणि बाकरवडी मिळवा, चितळेंची अनोखी शक्कल
त्याची लिव्ह इन गर्लफ्रेंड बाल्सेने स्थानिक मीडिया रॅप्लरला सांगितलं की, शुक्रवारी सकाळी परत आल्यावर डॅरेन याला प्रचंड वेदना होत होत्या. जेव्हा सकाळी आठच्या सुमारास तो परत आला तेव्हा त्याला एका व्यक्तीने घरी येण्यास मदत केली. मी त्याला विचारले की, तुला मारहाण झाली का? तर तो हसला. पण त्याला प्रचंड वेदना होत असल्याचं स्पष्ट दिसत होते. त्याचा चेहरा काळा पडला होता आणि हार्टबीट्स थांबले.
पोलिसांनी आरोप फेटाळले
स्थानिक अधिकारी रोडोल्फो क्रूझ ज्युनिअर यांनी रॅप्लरला फोनवरुन दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, डॅरेन याला ग्रामीण सुरक्षारक्षकांनी ताब्यात घेतले होते. त्या अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे.
पुन्हा लॉकडाऊन! या काळात कसा दूर कराल तणाव, या गोष्टी नक्की करतील मदत....
तर जनरल ट्रायस शहरातील पोलीस प्रमुख लेफ्टनंट कर्नल मार्लो निल्लो सोलेरो यांनी डॅरेनच्या नातेवाईकांचा आरोप फेटाळून लावला आहे. तसेच डॅरेनला अशी कोणत्याही प्रकारची शिक्षा दिली नसल्याचं म्हटलं आहे.
प्रकरणाची चौकशी सुरू
तर स्थानिक महापौर अँटोनियो फेरेर यांनी सोमवारी एका फेसबुक पोस्टमध्ये म्हटले की, या प्रकरणाची चौकशी केली जात आहे आणि ते सातत्याने मृतक तरुणाच्या कुटुंबाच्या संपर्कात आहेत. त्यांनी सांगितले की, "आम्ही ताबडतोब आमच्या पोलीस प्रमुखांना घटनेविषयी निष्पक्ष चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. मला आशा आहे की, आम्ही या घटनेवर त्वरित स्पष्टीकरण देऊ शकू."
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Pandemic, Rules violation