गेली वर्षभर लॉकडाऊन होता. मात्र काही महिन्यांपासून सर्व सुरळीत चालू होतं आणि आता परत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघून लॉकडाऊन होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. मग या काळात तुम्ही आपला वेळ आणि तणाव कसा घालवाल.
लॉकडाऊनमुळे घरी एकाच वातावरणात बसून मानसिक तणाव निर्माण होतो. आणि अशा परीस्थित तुम्ही तणाव कमी करण्यासाठी कोणत्या गोष्टी करू शकता पाहा.
ध्यान- घरी बसून सकाळी उठल्यावर काही मिनिटे ध्यान म्हणजेच मेडीटेशन करा. यामुळे तुमच्या मनाला शांतात लाभते. आणि तणाव दूर होतो.
वाचन- घरी बसून तणाव येत असेल तर आपल्याकडे उपलब्ध असलेली पुस्तके काढा आणि त्याचं वाचन सुरु करा. त्यामुळे सुद्धा तुमचा वेळ चांगल्याप्रकारे खर्च होऊ शकतो.
कुकिंग- तुम्ही घरी बसल्या बसल्या आपल्या कुटुंबासोबत मिळून वेगवेगळे पदार्थ बनवू शकता. त्यामुळे तुम्हाला एक वेगळाच आनंद मिळेल.
घरी बाग- घरीच उपलब्ध असलेल्या जागेत एक छोटीशी बाग तयार करा. त्यामध्ये वेगवेगळ्या फळभाज्यांची किंवा फुलांची लागवड करा.
नृत्य - घरी बसून कंटाळा येत असेल तर दररोज थोडा वेळ आपल्या कुटुंबासोबत नृत्य करू शकता. त्यामुळे तुम्हाला एक उत्साह वाटेल. आणि ताण दूर होईल.
संगीत- या काळात तुम्ही दररोज थोडावेळ तुमच्या आवडीची गाणी ऐकू शकता. त्यामुळे तुमचा तणाव दूर होईल. तुमचा वेळही जाईल.